स्त्री बीजांची विक्री! म्हणजे नेमकं करतात काय, महिलांच्या शरीरातून बीज कसे काढतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Human Egg Extraction : स्त्रीबीजांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हे लोक नेमकं काय करतात, त्याची संपूर्ण माहिती.
बदलापूरमध्ये स्त्रीबीज विक्रीच्या रॅकेटमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात नाशिकमधून नामांकित डॉक्टरला अटकही करण्यात आली आहे. ज्याच्यावर सरोगेट मदर आणि स्त्रीबीज मिळवून देणारे एजंट म्हणून काम करत असल्याचा प्राथमिक आरोप आहे. या प्रकरणामुळे सरोगसी आणि आयव्हीएफ क्षेत्रातील काळ्या बाजाराचा पर्दाफाश झाला आहे. आयव्हीएफ सेंटरच्या नावाखाली गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे स्त्रीबीज अवैध मार्गाने विकले जात असल्याचा संशय आहे. पण स्त्रीबीजांची विक्री होते म्हणजे नेमकं काय? महिलांच्या शरीरातून बीज कसे काढतात? ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊयात.
महिलांच्या शरीरातून स्त्रीबीज बाहेर काढण्याची प्रक्रिया समजून घेण्याआधी स्त्रीबीज म्हणजे काय, ते कसे तयार होतात, त्यांची संख्या काय असते. याची माहिती घेऊयात. स्त्रीबीज म्हणजे महिलांच्या शरीरातील एग्ज किंवा अंडं. ही स्त्रीच्या शरीरातील प्रजनन पेशी आहे, जी दर महिन्याला ओव्हरी म्हणजे अंडाशयातून परिपक्व होऊन बाहेर पडते, या प्रक्रियेला ओव्हुलेशन म्हणतात. ससाधारणपणे मासिक पाळीच्या मध्यंतरी म्हणजे 12-14 दिवसांत हे बीज बाहेर पडतं. जे साधारणपणे 12 ते 24 तास जिवंत राहतं. या कालावधीत पुरुषांचे स्पर्म किंवा शुक्राणूशी संपर्कात आल्यास गर्भधारणा होत आणि संपर्कात आलं नाही तर ते नष्ट होतं.
advertisement
महिलांच्या शरीरात स्त्रीबीज कसं तयार होतं?
मेंदूत पिच्युट्री नावाची एक छोटी ग्रंथी असते, ज्यातून रक्तात एफएसएच आणि एलएच हे दोन हार्मोन्स तयार होतात. दोन्ही हार्मोन्सचा बॅलेन्स होत जातो. महिलांच्या शरीरात दोन बीजकोश म्हणजे अंडाशय किंवा ओव्हरी असतात. हार्मोन्समुळे या अंडाशयात फॉलिक्स तयार होतात, ज्यात बीज असतं. मासिक पाळी सुरू झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 5-6 बीजांचा ग्रुप तयार होतो. पहिले 5-6 दिवस सगळे बीज एकाच गतीने वाढतात. सहाव्या-सातव्या दिवशी हार्मोन्सचा रेशिओ असा तयार होतो की चांगल्यातलं चांगलं बीज वेगळं किंवा बाहेर काढलं जातं आणि त्याचा आकार वाढत जातो. ज्याला डोमिनंट एग्ज म्हणतात.
advertisement
IVF Cost : मूल होत नाहीये, IVF करायला किती पैसे लागतात? भारतातील आयव्हीएफ एक्सपर्ट्सनी सांगितला खर्च
डोमिनंट एग्जचा सुरुवातीचा आकार 7, 8, 10 मिमी असतो. हार्मोन्स मदतीने त्याचा आकार वाढत जातो. चौदा-पंधराव्या दिवशी त्याचा आकार 20 मिमी होतो. इतका आकार वाढला की मेंदूतील पिच्युट्री ग्लँडकडे बीज परिपक्व झालं म्हणजे आता ते गर्भधारणेसाठी तयार असल्याचा संदेश जातो. यानंतर एलएच हार्मोन वाढतं आणि फॉलिकलमधील बीज फुटून बाहेर पडतं, फॅलोपिन ट्युब त्याला आपल्या आत खेचून घेतं. जिथं स्पर्म असेल तर स्पर्म आणि बीज एकत्र होऊन बीज तयार होतं.
advertisement
कोल्हापुरातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांनी ही संपूर्ण माहिती त्यांच्या युट्युब चॅनेलवर दिली आहे.
एका महिन्याला एकच स्त्रीबीज तयार होतं
महिलांच्या शरीरात दोन फिलोपाइन ट्युब आणि दोन ओव्हरीज असतात. दर महिन्यानाला मासिक पाळीच्या कालावधीत दोन्ही ओव्हरीमध्ये फॉलिक्स बनणं सुरू होतं. हे फॉलिक्स हळूहळू वाढतात, ज्यांच्या आत बीज असतात, फॉलिक्ल्सच त्यांना पोषण देतात. दोन्ही ओव्हरीपैकी एका ओव्हरीतील एकच फॉलिकल खूप वाढतो त्यातून हेल्दी एग्ज बाहेर पडतात. यालाच ओव्हेल्युशन म्हणतात. ओव्हेल्युशन झालं ही हेल्दी एगला फोल्युपन ट्युब आपल्या आता खेचून घेतात आणि तिथं स्पर्म असतील तर स्पर्म आणि एग्ज, एकत्र येऊन गर्भधारणा होते.
advertisement
प्रत्येक महिलेच्या शरीरात दर महिन्याला एका अंडाशयातून एकच स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडतं आणि ते बीज गर्भनलिका म्हणजे फॉलोपिअन ट्युबमध्ये जातं, असं प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अंजू अहुजा यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर दिलेल्या व्हिडीओत सांगितलं आहे.
advertisement
स्त्रीबीजांची संख्या कशी वाढवतात?
हार्मोनल इंजेक्शनद्वारे अनेक चांगल्या दर्जाची स्त्रीबीज तयार केली जातात. मासिक पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून इंजेक्शन दिलं जातं. 7-8 दिवस इंजेक्शन दिले जातात. णेकरून एकाच वेळी अनेक स्त्रीबीजे तयार व्हावीत. सोनोग्राफीत अंड्यांची वाढ तपासली जाते. स्त्रीबीजे पूर्ण पक्व झाल्यावर ती बाहेर येण्यासाठी ओव्हुलेशन होण्यापूर्वी एक ट्रिगर इंजेक्शन दिलं जातं.
advertisement
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रश्मी अगरवाल यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर या प्रक्रियेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
महिलांच्या शरीरातून स्त्रीबीज कसं बाहेर काढतात?
IVF उपचारांमध्ये स्त्रीबीज काढण्यासाठी 'ओवम पिक-अप' नावाची प्रक्रिया केली जाते. ट्रान्स व्हजायनल प्रोबमार्फत ओव्हरीवर फोकस केलं जातं. स्त्रीला भूल देऊन अल्ट्रासाऊंडच्या मदतीने एक पातळ सुई व्हजायनाच्या भिंतीतून अंडाशयात टाकली जाते आणि त्यामार्फत अंडाशयातील फॉलिक्समधील लिक्विड काढलं जातं, यात स्त्रीबीज असतात. हे लिक्विड एका ट्युबमध्ये जमा करून नंतर त्यातील एग्ज वेगळे केलं जातं. या प्रक्रियेला 10-15 मिनिटं लागतात. त्यानंतर स्त्रीला काही तासांत घरी सोडले जातं.
स्त्रीबीज विक्रीच्या रॅकेटमध्ये काय करतात?
स्त्रीबीज विक्रीच्या रॅकेटमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया केली जाते. स्त्रीबीजांची संख्या दुपटीने वाढवली जाते. प्रक्रियेदरम्यान एक की 15 किती स्त्रीबीजं मिळतील सांगता येत नाही. एकावेळी किती स्त्रीबीजं काढायचे याबाबत काही नियम, निकष नाहीत. त्यामुळे बीजांची संख्या कितीही असली तरी पैसे एकाच स्त्रीबीजाचेच दिले जातात. ज्या महिलेचं स्त्रीबीज काढायचं करारानुसार तिचा एक लाख रुपयांचा विमा काढला जातो. ही रक्कम खूप अपुरी आहे.
स्त्रीबीज देण्यासाठी आलेल्या महिला परराज्यातील आहेत. त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे सांगून घाई केली जाते आणि स्त्रीबीजं वाढवण्याची इंजेक्शन दिले जातात. या प्रक्रियेत तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असते, तरी ती घाईत उरकली जाते. प्रक्रियेत मध्यस्थ म्हणून कोण काम करतात, डॉक्टर कुणाकडून स्त्रीबीजं घेतात, त्याची किती नोंद ठेवली जाते याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
Location :
Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 4:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्त्री बीजांची विक्री! म्हणजे नेमकं करतात काय, महिलांच्या शरीरातून बीज कसे काढतात?







