आई-वडील सावळे मग मूल गोरं कसं काय; सायंटिफिकली हे कसं शक्य आहे? पुण्याच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिलं उत्तर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Black Parents Fair Baby : आम्ही दोघंही सावळे मग मूल गोरं कसं काय? असा संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बिहारमधील कटिहारमध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली कारण त्यांचं मूल गोरं होतं. पती स्वत: सावळा, पत्नीही सावळी मग मूल कसं काय गोरं होऊ शकतं? असा संशय पतीने पत्नीवर घेतला आणि त्याने पत्नीचा जीव घेतला. या घटनेनंतर आता सावळ्या त्वचेच्या जोडप्याला गोरं मूल होऊ शकत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. याबाबत सायन्स काय सांगतं डॉक्टर काय सांगतात ते पाहुयात.
मूलाच्या रंगावरून पत्नीची हत्या करणारी या व्यक्तीसारखे असे बरेच लोक आहेत, ज्यांना सावळ्या पालकांना गोरं मूल झालं किंवा गोऱ्या पालकांना सावळं मूल झालं की आश्चर्य वाटतं. हे कसं शक्य आहे, असं त्यांना वाटतं. यामागे विज्ञान आहे, ते समजून घेऊयात.
त्वचेला रंग कसा मिळतो?
आपल्या शरीरात मेलेनिन हा रंगद्रव्य आहे, जो रंग देणारा पदार्थ आहे. मेलेनिनचं प्रमाण जास्त असेल तर त्वचा काळी आणि कमी असेल तर त्वचा गोरी होते. आपल्या शरीरात किती मेलेनिन तयार होतं हे आपले जीन्स किंवा जनुकं ठरवतात. प्रत्येक माणसात रंगाशी संबंधित अनेक जीन्स असतात.
advertisement
आपल्याला हे जीन्स आपल्या पालकांकडून काही आईकडून काही वडिलांकडून वारशाने मिळता. या जनुकांच्या वेगवेगळ्या संयोजनांमुळे बाळ गोरं, सावळं किंवा या दोन्ही रंगाच्या मधे असू शकतो. म्हणजेच रंग एकाच जनुकाने ठरवला जात नाही, तर अनेक जनुकांनी एकत्रित केला जातो, त्यामुळे गर्भाशयातील बाळाचा रंग निश्चितपणे सांगता येत नाही.
advertisement
आई-वडील दोघं सावळे मग बाळ गोरं कसं?
आता तुम्ही म्हणाल आई आणि वडील दोघंही सावळे असतील तर मग त्यांचं मूल गोरं कसं होईल. तर हे पूर्णपणे शक्य आहे. वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहे. यामध्ये रेसेसिव्ह जीन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. पती आणि पत्नी दोघांचीही त्वचा सावळी असेल, पण त्यांच्याकडे फिकट त्वचेसाठी जीन्स देखील आहेत, जे बाहेरून अदृश्य असतात. जेव्हा बाळ पोटात असतं तेव्हा कधीकधी असे संयोजन घडतं जिथं फिकट जीन्स एकत्रित होतात ज्यामुळे मुलाची त्वचा पालकांपेक्षा गोरी बनते.
advertisement
तसंत वंशपरंपरा किंवा अनुवांशिक वारसा देखील यामध्ये भूमिका बजावते. म्हणजे फक्त आईवडीलच नाही तर आजी-आजोबा, पणजी आणि पणजोबा, यांची जनुके आपल्यात राहतात. जर एखाद्या जोडप्याच्या कुटुंबात मागील पिढीत खूप गोरी त्वचा असलेले लोक असतील. त्यांची जनुकं अजूनही त्यांच्या वंशात असतात आणि ती अचानक एखाद्या मुलामध्ये दिसू शकतात.
advertisement
पुण्यातील डॉक्चर सुप्रिया पुराणिक यांनीसुद्धा त्यांच्या युट्युब चॅनेलवर याबाबत माहिती दिली आहे. एकंदर काय तर प्रत्यक्षात मूल कधी आईसारखं, कधी वडिलांसारखं, कधी दोघांचं मिश्रण आणि कधी पूर्वजांसारखे असू शकतं.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 24, 2025 4:32 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आई-वडील सावळे मग मूल गोरं कसं काय; सायंटिफिकली हे कसं शक्य आहे? पुण्याच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिलं उत्तर


