नुकतंच लग्न झालेल्यांनी आवर्जून पाहावा हा VIDEO; अहिल्यानगरच्या डॉक्टरांनी दिलाय महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

Doctor Advice For Newly Married Couple : नुकतंच लग्न झालेल्या कपल्ससाठी अहिल्यानगरच्या डॉक्टरांनी खास सल्ला दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी नवविवाहातांसाठी महत्त्वाची अशी माहिती दिली आहे.

News18
News18
अहिल्यानगर : सध्या लगीनसराई सुरू आहे. कित्येक लग्न झाली, कित्येक होत आहेत आणि कित्येक होणार आहेत. आधी लग्नासाठी आणि लग्न झालं की बहुतेक कपल्सना गूड न्यूज कधी अशी विचारणा होते. काही कपल लग्नानंतर लगेच प्रेग्नन्सीचा चान्स घेतात, काही प्रेग्नन्सी पुढे ढकलतात. काही चुकून प्रेग्नंट होतात आणि मग गर्भपात करतात. नुकतंच लग्न झालेल्यांनी प्रेग्नन्सीबाबत कसा निर्णय घ्यावा, हे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
नुकतंच लग्न झालेल्या कपल्ससाठी अहिल्यानगरच्या डॉक्टरांनी खास सल्ला दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी नवविवाहातांसाठी महत्त्वाची अशी माहिती दिली आहे. डॉ. नितीन जगताप असं या डॉक्टरचं नाव, ते स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.
advertisement
डॉ. जगताप म्हणाले, लग्नानंतर बऱ्याचदा कपलला पहिल्या 2-3 महिन्यांतच प्रेग्नन्सी राहते. पण बऱ्याचदा सामाजिक दबाव, कुटुंबाचा दबाव, शिक्षण, करिअर अशा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी प्रेग्नन्सी टाळतात. गर्भनिरोधक वापरतात किंवा गर्भपात करतात. नंतर एक-दोन वर्षांनंतर जेव्हा त्यांना प्रेग्नंट व्हायचं असतं, तेव्हा प्रेग्नन्सीत समस्या येतात. म्हणून नुकतंच लग्न झालं असेल आणि प्रेग्नन्सीबाबत निर्णय घ्यायचा असेल तर एक टेस्ट नक्की केली पाहिजे. लग्नानंतर प्रेग्नन्सी प्लॅनिंगसाठी तुम्ही किती वेळ वाट पाहू शकता, हे या टेस्टमधून समजेल.
advertisement
"या टेस्टचं नाव आहे AMH म्हणजे अँटी म्युलेरियन हार्मोन. महिलांची ब्लड टेस्ट आहे. या टेस्टमुळे आपल्याला हे समजतं की महिलांच्या अंडाशयामध्ये किती बीजांडं शिल्लक आहेत", असं डॉ. जगताप म्हणाले.
AMH टेस्टनुसार प्रेग्नन्सीचा निर्णय कसा घ्यावा?
AMH ची व्हॅल्यु 4 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी एक वर्षे किंवा त्यापेक्षा थोडा जास्त काळ वाट पाहू शकता.
advertisement
जर AMH ची व्हॅल्यु 2 ते 4 मध्ये असेल. तर एक वर्षापर्यंत प्रेग्नन्सी प्लॅनिंग करू शकता. पण जर एएमएची व्हॅल्यू 1.5 ते 2 असेल तर प्रेग्नन्सी लांबवू नका. लवकरात लवकर चान्स घ्या.
जर AMH ची व्हॅल्यु 1.5 ते 0.3 असेल तर ही खूपच कमी आहे. तुम्ही लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
advertisement
प्रेग्नन्सी प्लॅनिंग करण्यापूर्वी किंवा प्रेग्नन्सी लेट करण्यापूर्वी ही एक टेस्ट नक्की करा, असा सल्ला डॉ. नितीन जगताप यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
नुकतंच लग्न झालेल्यांनी आवर्जून पाहावा हा VIDEO; अहिल्यानगरच्या डॉक्टरांनी दिलाय महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement