Water : सगळे सांगतात भरपूर पाणी प्या, पण ठाण्याचे डॉक्टर म्हणाले, 'सारखं पाणी पिऊ नका', सांगितले परिणाम

Last Updated:

Water Drinking Rule : पाणी आरोग्यासाठी शरीरासाठी महत्त्वाचं असताना एखादा डॉक्टर का बरं असा सल्ला देईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं उत्तर जाणून घेऊया.

News18
News18
ठाणे : पाणी भरपूर प्यायला हवं, असं सांगितलं जातं. दिवसभरात किमान 2 लीटर पाणी प्यावं, असा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ठाण्यातील एका डॉक्टरने सांगितलं की सारखं पाणी पिऊ नका. पाणी आरोग्यासाठी शरीरासाठी महत्त्वाचं असताना एखादा डॉक्टर का बरं असा सल्ला देईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं उत्तर जाणून घेऊया.
ठाण्यातील आयुर्वेदिक डॉक्टर ऋचा मेहेंदळे पाई यांनी सारखं पाणी न पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी यामागील कारणही सांगितलं आहे. जास्त पाणी पिण्याचे परिणाम काय होतात ते सांगितलं आहे. तसंच पाणी नेमकं कधी प्यायचं हेसुद्धा त्यांनी सांगितलं आहे.
advertisement
डॉ. ऋचा यांनी सांगितलं की, आपण पाणी पितो तेव्हा हवासुद्धा आपल्या शरीरात जाते. त्यामुळे खूप जास्त पाणी पितात त्यांना गॅसचाही त्रास होतो. जास्त पाणी प्यायलात तर त्या पाण्याचा निचराही झाला पाहिजे. जसं अन्नाचं पचन होतं, तसं पाण्याचंही पचन होणं गरजेचं आहे.
पाणी पिण्याबाबत जे नियम सांगितले गेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. असं कुठेच सांगितलं गेलं नाही आहे की खूप पाणी प्या. पण पण तुम्हाला तहान लागल्यावर मात्र पाणी प्यायला पाहिजेच, असं त्या म्हणाल्या.
advertisement
अति प्रमाणात पाणी पिण्याचे 7 दुष्परिणाम
इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन : आपल्या शरीराच्या नियमित कार्यासाठी सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स अत्यंत महत्त्वाचे असतात. जास्त पाणी प्यायल्याने हे इलेक्ट्रोलाइट्स शरीरात विरघळतात आणि त्यांचे प्रमाण कमी होते. यामुळे स्नायूंमध्ये पेटके येणे, सतत थकवा जाणवणे आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वाढते.
हायपोनॅट्रेमियाचा धोका : खूप जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील सोडियमची पातळी धोकादायक पातळीपर्यंत खाली येते. या स्थितीला हायपोनॅट्रेमिया म्हणतात. यामुळे मेंदूला सूज येऊ शकते, उलट्या होऊ शकतात आणि गंभीर स्थितीत दौरेही येऊ शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्ण कोमात जाऊ शकतो आणि त्याचा जीवही जाऊ शकतो.
advertisement
झोपेवर परिणाम : जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला रात्री वारंवार लघवीला जावे लागू शकते. यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रचंड थकवा जाणवतो. अपूर्ण झोप तुमच्या दैनंदिन कामांवरही नकारात्मक परिणाम करू शकते.
हृदयावर अतिरिक्त ताण : जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी पिता, तेव्हा तुमच्या रक्ताचे प्रमाण वाढते. यामुळे तुमच्या हृदयावर अधिक भार येतो. हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो. हृदयविकारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी ही स्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते.
advertisement
शरीराला सूज : जास्त पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सूज येण्याची शक्यता वाढते. विशेषतः बोटे आणि पायांना सूज दिसत असेल, तर ते तुमच्या जास्त पाणी पिण्याचे लक्षण असू शकते.
पचनक्रियेत अडथळा : जास्त पाणी प्यायल्याने तुमच्या पोटात असलेले आवश्यक ऍसिड पातळ होऊ शकते. हे ऍसिड अन्न पचनासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. ते पातळ झाल्याने तुमची पचनशक्ती कमजोर होऊ शकते आणि तुम्हाला पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यासोबतच, अन्नातील पोषक तत्वांचे शोषणही योग्य प्रकारे होत नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Water : सगळे सांगतात भरपूर पाणी प्या, पण ठाण्याचे डॉक्टर म्हणाले, 'सारखं पाणी पिऊ नका', सांगितले परिणाम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement