शिळं अन्न खाऊन शरीराला फायदा होतो? ठाण्याच्या डॉक्टरने सांगितलं कसा होतो परिणाम

Last Updated:

Stale Food Effect On Body : शिळं अन्न खाऊ नये, असं अनेक जण आपल्याला सांगतात. शिळं अन्न खाण्याचा शरीराला काही फायदा आहे का? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

News18
News18
ठाणे : सध्या धावपळ आणि धकाधकीच्या जीवनशैलीत ताजं अन्नपदार्थ बनवून खाणं अनेकांना शक्य होत नाही. कुणी दोन वेळचं जेवण एकदाच बनवतं, कुणी रात्रीच भाजी-पोळी बनवून सकाळी ऑफिसमध्ये डब्यासाठी नेतं, तर कुणी काही उरलं तर फेकून देऊ नये म्हणून खातं. पण असं शिळं अन्न खाऊन शरीराला फायदा होतो का? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
शिळं अन्न खाऊ नये, असं अनेक जण आपल्याला सांगतात. शिळं अन्न खाण्याचा शरीराला काही फायदा आहे का? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. ठाण्याच्या एका डॉक्टरने याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. डॉ. मानसी मेहंदळे धामणकर असं या डॉक्टरचं नाव आहे. त्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
advertisement
डॉ. मानसी म्हणाल्या की, बऱ्याच जणांना 24 तासांनंतर शिळं अन्नपदार्थ खायची सवय असते. या पदार्थांची त्यांना चव लागलेली असते. आयुर्वेद याला पर्युषित अन्न म्हणतं. उन्हाळ्यात दही जरी तुम्ही दिवसभर बाहेर ठेवलं तरी ते आंबलेलं असतं. त्याला तार आलेली असते.  त्यामुळे जे पाणीयुक्त पदार्थ आहेत ते शिळे अजिबात खाऊ नका.
advertisement
शिळं अन्न खाल्ल्याने आपल्या शरीरात घातक स्राव निर्माण होत असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणं. सतत तोंड येणं, केस गळणं, केस पांढरे होणं, त्वचा विकार इत्यादी त्रास होऊ शकतात. जे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला त्रास होतो असेल, अशी सवय असेल तर ती कधीही सोडणं चांगलं, असं त्या म्हणाल्या.
अन्न टाकायचं नाही ही आपली भारतीय परंपरा आहे. त्यामुळे शिळं अन्न कधीतरी खा पण बनवतानाच ते प्रमाणात बनवा, म्हणजे तुम्हाला शिळं अन्न खायलाच लागणार नाही, असा सल्ला डॉ. मानसी यांनी दिला आहे.
advertisement
शिळं अन्न खाण्याचे तोटे
विषबाधा : शिळं अन्न खाल्ल्याने माणसाला विषबाधा होण्याचा सर्वाधिक धोका असतो. अन्न शिजवल्यानंतर दोन तासांच्या आत फ्रीजमध्ये न ठेवल्यास त्यामध्ये अनेक बॅक्टेरिया आणि फंगस निर्माण होऊ लागतात. त्यामुळे शरीरात विषारी पदार्थांचं प्रमाण वाढतं. असं अन्न खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते. खासकरून शिळा भात व बटाटा यातून विषबाधेचा धोका सर्वाधिक असतो.
advertisement
पचनाशी संबंधित समस्या : शिळ्या अन्नामध्ये असलेले बॅक्टेरिया पचनाशी संबंधित समस्या निर्माण करू शकतात. हे बॅक्टेरिया पचनसंस्थेवर परिणाम करतात आणि पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीसारख्या समस्या होतात. अशा परिस्थितीत ज्यांची पचनशक्ती आधीच कमकुवत आहे त्यांनी चुकूनही शिळं अन्न खाऊ नये. कारण यामुळे त्यांच्या पोटात इन्फेक्शन होऊ शकतं. अन्न विषबाधा खूप जास्त वाढल्यास उलट्यांसोबत पोटात खूप दुखू लागतं, त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं व डायरियाची समस्या होते.
advertisement
पोषकतत्त्वांची कमतरता : अन्न वारंवार गरम केल्याने त्यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांसारखे पोषक घटक नष्ट होतात. असं अन्न खाल्ल्याने शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही. या अन्नामध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
शिळं अन्न खाऊन शरीराला फायदा होतो? ठाण्याच्या डॉक्टरने सांगितलं कसा होतो परिणाम
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement