Alcohol : दररोज दारू किती प्यायची? वैजापूरच्या डॉक्टरांनीच सांगितली लिमिट

Last Updated:

Alcohol Drinking Limit : डॉक्टर म्हणाले, खूप पूर्वी आमच्या टेक्स्टबुकमध्ये 30 मिली रेड वाईन रोज तुम्ही घेतली तर ती 5 मिली, 10 मिली रेड वाइन प्यायलात तर तुम्हाला हृदयरोगापासून संरक्षण मिळतं असं लिहिलं होतं. पण...

News18
News18
काही लोक म्हणतात की थोडीशी दारू पिणं चांगलं. म्हणून असे लोक दररोज थोडी का होईना दररोज दारू पितात. पण जर दारू चांगली म्हणतात तर मग ती किती पिणं चांगलं, दररोज किती दारू प्यायची असा प्रश्न काही मद्यप्रेमींना पडतो. याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
जेव्हा कुणी दारू पितं तेव्हा शरीरात गेल्यानंतर ती 30 सेकंदांनंतर रक्तप्रवाहात मिसळते आणि संपूर्ण शरीरात पसरत जाते. यानंतर ती पोटात जाते. काही वेळाने घाम आणि श्वासोच्छवासामार्फत बाहेर येते. काही प्रमाणात पोटात राहते. यानंतर 90 टक्के दारू लिव्हर आणि आतड्यांमध्ये जाते आणि नंतर तिचं पचन सुरू होतं. माहितीनुसार दारू प्यायल्यानंतर तशी ती 72 तासांपर्यंत शरीरात राहते पण  दारू शरीरात किती वेळ राहते हे दारूचं प्रमाण, गुणवत्ता आणि पिण्याची पद्धत इत्यादींवरही अवलंबून असतं.
advertisement
आता दारू किती प्यायली तर शरीराला इजा होणार नाही? तर याबाबत वैजापूरचे डॉक्टर अमोल अन्नदाते सांगतात की, "खूप पूर्वी आमच्या टेक्स्टबुकमध्ये 30 मिली रेड वाईन रोज तुम्ही घेतली तर ती 5 मिली, 10 मिली रेड वाइन प्यायलात तर तुम्हाला हृदयरोगापासून संरक्षण मिळतं असं लिहिलं होतं. पण नंतर संशोधनाममध्ये ही गोष्ट मोडीत निघाली. असं काहीही नाही, हा गैरसमज आहे"
advertisement
"दारू पिण्याचं असं कोणतंही प्रमाण नाही. कितीही कमी वेळा, कितीही जास्त वेळा, कितीही कमी प्रमाणात, कितीही जास्त प्रमाणात दारू ही दारूच असते आणि दारू ही वाईटच असतं", असं डॉ. अन्नदाते म्हणाले.
दारूचे मेंदूच्या आरोग्यावर होणारे परिणाम
काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अल्कोहोलमुळे दीर्घकाळ निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि लगेच निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होते. जे तुमच्या मज्जातंतूंवर परिणाम करू शकते आणि त्यांना नुकसान पोहोचवू शकते. मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच शरीराच्या ऊर्जा उत्पादक यंत्रावर परिणाम करते . ज्यामुळे मेंदूची स्मरणशक्ती कमकुवत होते आणि डिमेंशियाचा धोका वाढतो. तसेच, मेंदू हळूहळू आकुंचन पावू लागतो. याशिवाय, अल्कोहोल मेंदूचे रासायनिक संतुलन बदलते, ज्यामुळे नैराश्य, चिंता आणि मूड स्विंग्स सारख्या मानसिक समस्या उद्भवू शकतात. थोड्या प्रमाणात अल्कोहोल देखील संज्ञानात्मक कार्ये आणि निर्णय घेण्यावर परिणाम करते.
advertisement
वजन कमी करण्यात अडथळा
जर तुम्ही वजन कमी करायचा विचार करत असाल आणि तुम्हाला दारू पिण्याची सवय असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकत. जर तुम्ही चरबी कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर अल्कोहोल चरबीचे ऑक्सिजनेशन रोखते, म्हणजेच ते तुमच्या फिटनेस ध्येयांना अडथळा आणते. रिकाम्या कॅलरीजमध्ये कोणतेही पोषण नसते. तसेच, अल्कोहोल पिण्यामुळे वारंवार आणि अनियंत्रित खाणे होते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.
advertisement
दारू पिण्याचे इतर धोके
दारू प्यायल्याने वजन वाढते शिवाय ते अनियंत्रित खाण्याला प्रोत्साहन देते. दारू पिल्याने झोपेची गुणवत्ता देखील बिघडते, ज्यामुळे थकवा आणि मानसिक कमजोरी वाढते. याशिवाय, यकृतावर अतिरिक्त ताण येतो आणि यकृताच्या आजाराचा धोका वाढतो. अल्कोहोलमुळे फॅटी लिव्हर डिसीजसारख्या समस्या देखील उद्भवतात. याशिवाय, अल्कोहोलमुळे दीर्घकाळात इन्सुलिन, रेझिस्टन्स आणि मेटाबॉलिक सिंड्रोम सारख्या चयापचय नुकसान देखील होतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Alcohol : दररोज दारू किती प्यायची? वैजापूरच्या डॉक्टरांनीच सांगितली लिमिट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement