अजब कारभार! डोंबिवलीत आधी काँक्रीट रस्ता बांधला, मग 400 फूट फोडला, कारण...
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Dombivli News: डोंबिवलीतील या भागात रस्ते कोणतेही नियोजन न करता घाईत बनवण्यात आले. त्यामुळे आता गटार, नाले, जलवाहिन्यांसाठी रस्ता फोडण्याचे काम सुरू असते.
डोंबिवली: आधी चांगला रस्ता बनवून तो नाल्यासाठी पुन्हा उकरण्याचे प्रकार तसे नवे नाहीत. परंतु, डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागात कहर केला आहे. अंदाजे 40 फूट रुंद आणि 10 फुटांचा छेद देऊन 400 फुटांचा नवा काँक्रीट रस्ता कंत्राटदाराकडून उखडण्यात आला आहे. त्यामुळे ऐन उत्सवाच्या आणि परीक्षेच्या काळात रस्ता बंद राहणार असल्याने पालक, विद्यार्थी आणि नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागात मिलापनगरमधील गणेश विसर्जन तलाव रस्त्यावर ग्रीन्स स्कूल, श्रीराम वरदायिनी सोसायटीजवळ हे काम सुरू आहे. हा रस्ता गेल्या चार दिवसांपासून वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच पुढचे काही दिवस रस्ता बंदच राहणार आहे.
advertisement
डोंबिवलीतील या भागात रस्ते कोणतेही नियोजन न करता घाईत बनवण्यात आले. त्यामुळे आता गटार, नाले, विद्युत आणि जलवाहिन्यांसाठी रस्ता फोडण्याचे काम सातत्याने सुरू असते. त्याचा फटका नागरिकांना आणि वाहनधारकांना बसत आहे. पावसाळ्यात देखील येथील रहिवाशांना कसरत करावी लागेल.
दरम्यान, आतापर्यंत विद्युत आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी जास्तीत जास्त दोन फुटांचा छेद मारून काँक्रीट रस्ता फोडला जायचा. मात्र, आता या ठिकाणी खड्डा केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून जावे लागते. तर काही विद्यार्थी, पालक आणि नागरिक वेळ वाचवण्यासाठी फोडलेल्या रस्त्यातूनच कसरत करत चालत जातात.
advertisement
सध्या होळी, रंगपंचमी, शिवजयंती आणि आगामी गुढीपाडवा अशा सण आणि उत्सवांचा काळ आहे. त्यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे प्रशासनाने नाल्याचे काम करताना या बाबींचा विचार करून निर्णय घेणे गरजेचे होते, असे स्थानिकांनी म्हटले आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 4:07 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
अजब कारभार! डोंबिवलीत आधी काँक्रीट रस्ता बांधला, मग 400 फूट फोडला, कारण...









