ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांनी सरकारकडून काही मुद्यांवर स्पष्टीकरण मागत चर्चेची मागणी केली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात गोंधळ दिसून आला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात दुपारच्या सत्रात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. या चर्चेत भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली.
advertisement
सु्प्रिया सुळेंनी सूर्याला धुतलं...
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तेजस्वी सूर्या यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्या भाषणात बोलताना म्हटले की,''मी तेजस्वी सूर्या यांना सांगू इच्छिते आणि ते रेकॉर्डवर ठेवू इच्छिते. सूर्या यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजींनी कधीही संरक्षण दलांना प्रोत्साहन दिले नाही आणि आम्ही कधीही काहीही केले नाही. भारताने यावेळी पहिल्यांदाच सशस्त्र दलांना असामान्य कामगिरी करताना पाहिले आहे. मात्र, सूर्या यांचे हे वक्तव्य हे लाखो भारतीय सैन्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा अपमान करणारे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताचा पराभव झाला असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी जो इतिहास वाचला, त्यात भारताचा पराभव म्हटले असेल. आम्हाला इतिहास वाचण्याचा सल्ला ही मंडळी देतात. पण आम्हाला जो इतिहास शिकवला, माहिती आहे तो वेगळा असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी भारतीय लष्कराची युद्धातील कामगिरी सांगितली.
सुप्रिया सुळे यांनी भारतीय लष्कराने केलेली कामगिरी सभागृहाला सांगितली. भारतीय लष्कराने भारत-पाकिस्तान युद्ध 1948, हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी ऑपरेशन पोलो 1948, गोवा, दीव दमण हे राज्य पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी 1961 मध्ये ऑपरेशन विजय यशस्वी झाले. त्याशिवाय 1965 च्या भारत-पाक युद्धात लष्कराने पाकिस्तानचे सगळे मनसुबे उद्धवस्त करत विजय मिळवला. 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीसंग्रामात भारतीय लष्कराने मोठं शौर्य दाखवलं. बांगलादेशला स्वतंत्र केलंच शिवाय, 90 हजार पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडले असल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जेव्हा आम्हाला किरण रिजिजू यांचा फोन आला तेव्हा त्यांनी मला फोनवर सांगितले की, सुप्रिया, तुम्हाला देशासाठी 10 दिवस द्यावे लागतील... पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्यासाठी विश्वास दाखवला. सर्वपक्षीय बैठकीत, काँग्रेस पक्षाने सर्वप्रथम सांगितले की काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण विरोधी पक्ष केंद्र सरकारसोबत पूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याचे सांगितले होते. लोकशाही, देशाचे हित प्रथम असं असल्याचे त्यांनी सांगितले.