पहलगाम हल्ला, केंद्र सरकारने राबविलेले ऑपरेशन सिंदूरवर संसदेत वादळी चर्चा सुरू आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं. आता पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर दिलं आहे.
'काँग्रेसचा निव्वळ बालिशपणा'
ऑपरेशन सिंदूर राबवताना भारताला कोणीही कारवाई करण्यापासून रोखलं नाही. १९३ देशांनी पाठिंबा दिला. फक्त ३ देश पाकिस्तानच्या विरोधात उत्तर दिलं होतं. सगळे देश भारताला समर्थन देत होते. जगाचं समर्थन मिळालं पण दुर्भाग्य आहे माझ्या सैनिकांना काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही. २२ एप्रिल पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसचे लोक उड्या मारत होते, कुठे गेली ५६ इंच छाती, कुठे गेला मोदी, मोदी तर फेल झाला, काय मजा घेत होते. वा बाजी मारली असं त्यांना वाटत होतं. काँग्रेसला पहलगाम हल्ल्यातील मृत झालेल्या लोकांमध्ये ही आपलं राजकारण शोधत होते. माझ्यावर टीका करत होते. पण, त्यांच्या टीका, त्यांचा बालिशपणा देशाच्या सैन्याचं मनोबल कमी करत होते. काँग्रेसच्या काही नेत्यांना भारताच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, ना भारतीय सैन्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते सतत ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थितीत करत होते. तुम्ही लोक मीडियामध्ये हेडलाईन घेऊ शकता पण भारतीयांच्या मनात जागा निर्माण करू शकत नाही' असं प्रत्युत्तर मोदींनी काँग्रेसला दिलं.
advertisement
'सीमेपार असलेला प्रपोगंडा'
'१० मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं, त्यावरून इथं संसदेत बरेच बोलले आहे. पण हाच तो प्रपोगंडा आहे जो सीमेपार पसरवला आहे. काही लोक हे सैन्यानं दिलेल्या तथ्यावर न बोलता पाकिस्तानने पुरवलेल्या खरं खोटं करण्यात धन्य मानत आहे. सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा जवानांनी पाकव्याप्त भागात जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केलं. एका दिवसाच्या ऑपरेशनमध्ये जवान परत आहे. बालकोट एअरस्ट्राईक केल्यावर दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये लक्ष ठरलेलं होतं दहशतवाद्यांचे एपी सेंटर होते, पहलगामच्या दहशतवाद्यांना जिथून ट्रेनिंग मिळालं, तिथे आपण हल्ला केला.
'ऑपरेशन सिंदूर सुरू आहे'
भारतीय सैन्याच्या हल्ल्याने पाकिस्तानला मोठा हादरा बसला होता. त्यानंतर पाकिस्तानने डीजीएसमोर विनवणी केली. आता खूप मारलं आता बस्स करा. मी लोकशाहीच्या मंदिरात सांगतोय ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. पाकिस्तानने जर पुन्हा कुरापती काढल्या तर जशास तसे उत्तर दिलं जाईल, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.
भारत एकीकडे आत्मनिर्भर होत आहे. पण काँग्रेस मुद्दे काढण्यासाठी पाकिस्तानच्या मुद्यावर जगत आहे. काँग्रेसला पाकिस्तानचे मुद्दे आणावे लागत आहे. दुर्दैवाने काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पाकिस्तानचे प्रचारक बनले आहे. देशाच्या सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केला. त्यावेळी काँग्रेसने सैन्याकडे पुरावे मागितले. पण देशाचा सूर पाहिला आणि त्यांनी मूड बदलला आणि त्यांनी पलटी मारली. बालकोटमध्ये एअरस्ट्राईक केलं. एअरस्ट्राईक केले त्याचे फोटो मागायला लागले. पायलट अभिनंदन पकडले गेले. पाकिस्तानमध्ये आनंदाचं वातावरण होतं, पण इथं काही लोक होते, त्यांनी लोकांच्या कानात सांगत होते, आता मोदी फसला, अभिनंदन यांना आणून दाखवा, बघू मोदी काय करतोय. पण अभिनंदन परत आहे आणि यांची बोलती बंद झाली, असा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला.
