TRENDING:

Telangana Bus Accident : बसच्या कोणत्या बाजूला बसल्याने वाचेल जीव? तेलंगणातील भीषण अपघातातून वाचलेल्या प्रवाशानं सांगितला थरारक प्रसंग

Last Updated:

मी शुद्धीवर आलो तेव्हा माझं अर्धं शरीर वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबलं होतं. माझ्याजवळचे अनेक लोक पूर्णपणे खाली गाडले गेले होते, असं तो प्रवासी म्हणाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी घडलेला भीषण बस अपघात संपूर्ण राज्याला हादरवून गेला. चेवेला परिसरात राज्य परिवहन महामंडळाची बस आणि टिपर ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 19 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. बसची परिचालिका राधा यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी बसमध्ये 72 प्रवासी होते.
बस अपघात
बस अपघात
advertisement

अपघातातून थोडक्यात बचावलेला एक प्रवासी त्या क्षणाचं वर्णन करत म्हणाला, "मी बसच्या डाव्या बाजूला बसलो होतो आणि हलकीशी डुलकी घेत होतो. अचानक जोरदार आवाज झाला आणि क्षणात सगळं कोसळल्यासारखं वाटलं. मी शुद्धीवर आलो तेव्हा माझं अर्धं शरीर वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबलं होतं. माझ्याजवळचे अनेक लोक पूर्णपणे खाली गाडले गेले होते."

त्याने पुढे सांगितलं, "मी खिडकी फोडून बाहेर आलो. माझ्यासोबत आणखी सहा प्रवासी बाहेर पडले. पण ड्रायव्हर साइडला बसलेले लोक बाहेर येऊ शकले नाहीत. तिकडच्या बहुतेक जणांचा जागीच मृत्यू झाला आहे."

advertisement

या प्रवाशाच्या म्हणण्यानुसार, बसच्या चालकाच्या बाजूला बसलेले सर्वाधिक जखमी आणि मृत्युमुखी पडले, तर कंडक्टरच्या बाजूला बसलेले प्रवासी जिवंत बाहेर आले. पण असं असलं तरी हा त्या प्रवाशाचा अनुभव आहे. पण कोणती सीट किंवा बाजू ही सेफ आहे किंवा धोकादायक हे अपघात कुठे आणि कसा होतो? यावर अवलंबून आहे.

बचावकार्यादरम्यान पोलिस अधिकारी जखमी

advertisement

अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. चेवेला पोलिस ठाण्याचे इंस्पेक्टर श्रीधर हेही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, मदत कार्य सुरू असतानाच एक जेसीबी त्यांच्या पायावरून गेली, ज्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. सुदैवाने त्यांची दुखापत गंभीर नाही.

चेवेला येथील आमदार काले यादैया यांनी या भीषण अपघातामागचं कारण उघड केलं. त्यांनी सांगितलं, “हा मार्ग अतिशय अरुंद आहे आणि रस्त्याचं रुंदीकरण अर्धवटच राहिलं आहे. पाच वर्षांपूर्वी कामाला मंजुरी मिळाली होती, पण काही लोकांनी NGT मध्ये केस केल्याने काम थांबलं. त्यामुळे इथे सतत अपघात होत आहेत. आता केस मागे घेतली आहे आणि दोन दिवसांपूर्वीच रुंदीकरणाचं काम पुन्हा सुरू झालं आहे.”

advertisement

या अपघाताने एक गोष्ट स्पष्ट केली, बसच्या कोणत्या बाजूला बसलंय, यावर तुमचा जीव अवलंबून असू शकतो. चालकाच्या बाजूने बसलेले जास्त प्रवासी मृत्युमुखी पडले, तर दुसऱ्या बाजूचे काहीजण खिडक्या फोडून बाहेर येऊ शकले. हे उदाहरण दाखवून देतं की प्रवास करताना सुरक्षित आसन, सीट बेल्ट आणि जागरूकता किती महत्त्वाची आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

तेलंगणातील हा अपघात फक्त एक दुर्घटना नाही, तर एक इशारा आहे. थोडी सावधगिरी अनेक जीव वाचवू शकते. प्रवासात सीट निवडताना आणि गतीमर्यादा पाळताना फक्त आरामच नव्हे, तर सुरक्षितता लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Telangana Bus Accident : बसच्या कोणत्या बाजूला बसल्याने वाचेल जीव? तेलंगणातील भीषण अपघातातून वाचलेल्या प्रवाशानं सांगितला थरारक प्रसंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल