TRENDING:

अर्ध्या अमेरिकेचा मालक तरी श्रीमंतांच्या यादीत नाही! कोण आहे ही व्यक्ती?

Last Updated:

जवळजवळ प्रत्येक मोठ्या कंपनीत पार्टनर म्हणून लॅरी फिंक असतातच. हा एक माणूस त्याच्या एकट्याच्या बळावर जगातल्या शेअर बाजारांमध्ये उलथापालथ करू शकतो. असं असलं तरी वैयक्तिक संपत्ती या निकषावर मात्र ते जगातल्या श्रीमंत माणसांच्या यादीत नाहीत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 18 डिसेंबर : एलन मस्क, जेफ बेझॉस, बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग, बर्नार्ड अर्नाल्ट ही जगातल्या श्रीमंत व्यक्तींची नावं आपण ऐकलीच असतात; पण या सगळ्यांपेक्षा मोठं एक नाव म्हणजे लॅरी फिंक. यांच्याबद्दल फारसं कुणाला माहिती नाही. जगातल्या कोट्यवधी व्यक्तींच्या पैशांचं व्यवस्थापन करण्याचं काम करणारी ही व्यक्ती आहे. तसंच जवळजवळ प्रत्येक मोठ्या कंपनीत पार्टनर म्हणून लॅरी फिंक असतातच. हा एक माणूस त्याच्या एकट्याच्या बळावर जगातल्या शेअर बाजारांमध्ये उलथापालथ करू शकतो. असं असलं तरी वैयक्तिक संपत्ती या निकषावर मात्र ते जगातल्या श्रीमंत माणसांच्या यादीत नाहीत.
अर्ध्या अमेरिकेचा मालक तरी श्रीमंतांच्या यादीत नाही!
अर्ध्या अमेरिकेचा मालक तरी श्रीमंतांच्या यादीत नाही!
advertisement

ब्लॅकरॉक इंक या अमेरिकेतल्या मल्टिनॅशनल इन्व्हेस्टमेंट कंपनीचे लॅरी फिंक हे संस्थापक आहेत. जगातली सर्वांत मोठी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणून तिचा नावलौकिक आहे. कंपनीचं अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट 9.43 ट्रिलियन डॉलर्स एवढं आहे. ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये लिहिणंही अत्यंत अवघड आहे. तसा प्रयत्न करायचा झाला तर ही रक्कम 78,54,75,62,20,00,000 एवढी म्हणजे 78 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. ही रक्कम अमेरिकेच्या जीडीपीच्या (सकल राष्ट्रीय उत्पादन) साधारण निम्मी आहे, तर इतर काही देशांच्या जीडीपीच्या किती तरी पट आहे. पाकिस्तानसारख्या 50 देशांचा जीडीपीही कमी ठरेल!

advertisement

Dawood Ibrahim : दाऊद मेला की जिवंत? ती बातमी खरी की खोटी? नवी माहिती समोर, छोटा शकील म्हणाला...

लॅरी फिंक यांनी 1988मध्ये ब्लॅकरॉक इंक या कंपनीची स्थापना केली. शेअर मार्केटमध्ये प्रचंड रस असल्यामुळे त्यांनी या कंपनीची स्थापना केली. आज ते ज्या स्थानावर आहेत त्याची त्या वेळी त्यांनी कल्पनाही केली नव्हती. ब्लॅकरॉक इंक या कंपनीचं मोठेपण सांगायचं तर जगातले कित्येक गडगंज शेअर्स आणि बाँड्सची 10 टक्के जबाबदारी ही कंपनी सांभाळते. जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तिचा हिस्सा आहे. त्यामुळेच जगातली सगळ्यात मोठी शॅडो बॅंक असाही तिचा लौकिक आहे. मार्केट कॅप पाहिली, तर अ‍ॅपलमध्ये ब्लॅकरॉक इंक या कंपनीची 6.5 टक्के भागीदारी आहे. फेसबुकमध्ये 6.5 टक्के, तर जेपी मॅार्गनमध्येही ब्लॅकरॉक इंकची 6.5 टक्के गुंतवणूक आहे. डॉयच बॅंकेत 4.8 टक्के, तर अल्फाबेट इंकमध्ये 4.48 टक्के वाटा आहे. फोर्ब्ज मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2022मध्ये लॅरी फिंक यांची संपत्ती 1 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी होती.

advertisement

अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आपल्या क्लायंटकडून आलेली रक्कम शेअर बाजारात किंवा इतर ठिकाणी गुंतवते. रिअल इस्टेट, बाँन्ड्स आणि स्टॉक मार्केटमध्ये ही गुंतवणूक केली जाते. म्युच्युअल फंड्स हा व्यवसायसुद्धा अ‍ॅसेट मॅनेजमेंटमध्ये मोडतो.

मराठी बातम्या/देश/
अर्ध्या अमेरिकेचा मालक तरी श्रीमंतांच्या यादीत नाही! कोण आहे ही व्यक्ती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल