Dawood Ibrahim : दाऊद मेला की जिवंत? ती बातमी खरी की खोटी? नवी माहिती समोर, छोटा शकील म्हणाला...
- Published by:sachin Salve
Last Updated:
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली होती. पण हे वृत्त छोटा शकीलने फेटाळलं आहे.
नवी दिल्ली, 18 डिसेंबर : अंडरवर्ल्ड डॉन आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. पण दाऊदला काहीच झालं नाही, त्याची प्रकृती एकदम ठीक आहे, अशी माहिती त्यांचा राईट हँड छोटा शकील याने दिली.
दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली होती. पण हे वृत्त छोटा शकीलने फेटाळलं आहे. 'दाऊद जिवंत आणि निरोगी आहे. ही फेक न्यूज पाहून मलाही धक्का बसला. काल मी त्याला अनेकदा भेटलो,' असं शकीलने न्यूज18 शी बोलताना सांगितलं.
काय होती बातमी?
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दाऊद इब्राहिमला गेल्या दोन दिवसांपासून कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामुळे रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दाऊदला कोणीतरी विष दिल्याचा दावा केला जात होता. सोशल मीडियावर दाऊदबाबतच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यानुसार विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत.
advertisement
भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेल्या दाऊद हा संघटित गुन्हेगारी, दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यासह विविध गुन्हेगारी कारवायांशी संबंध आहे. एवढेच नाही तर 1993मधील मुंबई बॉम्बस्फोटाचा तो मास्टरमाईंड आहे. त्या हल्ल्यात 250 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि हजारो लोक जखमी झाले होते.
advertisement
सध्या मुंबई पोलिसांसह भारतातील इतर तपास यंत्रणा दाऊदशी संबंधित या नवीन अपडेटबाबत अधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. या पूर्वी, जानेवारी महिन्यामध्ये दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलाने एनआयएला सांगितलं होतं की, दुसऱ्या लग्नानंतर दाऊद कराचीमध्ये राहत होता. एनआयएने दाऊदविरुद्धच्या आरोपपत्रात असं म्हटलं आहे की, दाऊद आणि त्याचे प्रमुख साथीदार पाकिस्तानातील कराची विमानतळ नियंत्रित करतात.
Location :
Delhi,Delhi
First Published :
Dec 18, 2023 7:31 PM IST
मराठी बातम्या/देश/
Dawood Ibrahim : दाऊद मेला की जिवंत? ती बातमी खरी की खोटी? नवी माहिती समोर, छोटा शकील म्हणाला...








