खरगोन : भारतात विविध प्रजातीचे साप आढळतात. यामध्ये कॉमन क्रेट हा विषारी सापांच्या यादीत टॉप-4 मध्ये आहे. हा साप इतका विषारी आहे की त्याने चावा घेतल्यावर काही तासांतच माणसाचा मृत्यू होतो, असे तज्ज्ञ सांगतात. कॉमन क्रॅट हा एक अशा जातीचा साप आहे, जो कोब्रापेक्षा पाच पट विषारी साप आहे.
या सापाला सायलेंट किलर असेही म्हटले जातात. जेव्हा कॉमन क्रेट दंश करतो तेव्हा मुंगीने चावा घेतला असे वाटते. कारण या विषारी नागाने चावा घेतल्यावर वेदना होत नाहीत. त्यामुळेच आपल्याला साप चावला आहे किंवा सापाने दंश केला आहे, असे बहुतेक जणांना कळतही नाही.
advertisement
हा विषारी साप कुठे आढळतो -
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील मंडलेश्वर येथील रहिवासी आणि या विषयातील तज्ज्ञ महादेव पटेल यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, कॉमन क्रॅट भारतासोबतच बांग्लादेश, नेपाळ, अफगानिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान या देशातही आढळतो. हा साप देशातील चार सर्वात विषारी सापांपैकी एक आहे.
रात्री असतो सक्रिय -
महादेव यांनी सांगितले की, कॉमन क्रॅट बहुतेक थंडीच्या दिवसात आढळतो. दिशाचरी प्राणी असल्याने हा फक्त रात्रीच सक्रिय असतो. त्याने चावा घेतल्यावर दातांच्या खुणा क्वचितच दिसतात. त्यामुळे आपल्याला या सापाने चावा घेतला आहे, हे फक्त लक्षणांच्या आधारे शोधले जाऊ शकते. मात्र, अनेकदा लक्षणे दिसू लागेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. या सापाच्या चाव्याव्दारे अर्धांगवायूचा झटका देखील येऊ शकतो.
photos : उन्हाळ्यात पुरुषांना आवडते हे अत्तर, खूपच असते खास, तुम्हीही जाणून घ्या..
कॉमन क्रॅटने चावा घेतल्याची बहुतेक प्रकरणे जमिनीवर झोपणाऱ्यांमध्ये दिसतात. हा साप शरीरातील उष्णता जाणवल्यानंतर जवळ येतात. तसेच शरीराला पूर्णपणे चिकटून राहतो. ज्यावेळी व्यक्ती शरीराची हालचाल करतो, त्यावेली हा साप चावा घेतो. त्यामुळे बहुतेक प्रकरणांमध्ये व्यक्तीला त्याच्या छातीवर, पोटात आणि बगलाला चावा घेतल्याचे दिसून येते. हिवाळ्यात उबदार वातावरण हवे म्हणून हा सापसुद्धा कपड्यांचा आणि बेडरुमचा सहारा घेतो, असे त्यांनी सांगितले.
महादेव पटेल यांनी पुढे बोलताना सांगितले की, कॉमन क्रेटने दंश केल्यावर दीड तासाचा अवधी मिळतो. या दरम्यान, जवळच्या कोणत्याही रुग्णालयात पोहोचा. मात्र, यासोबतच त्यादरम्यान, व्यक्तीने स्वतःला शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. घाबरू नका, जास्त चालू नका, अजिबात धावू नका. यामुळे रक्ताभिसरण वाढेल आणि याचा फटका बसून तुमच्या शरीरात विष रक्तात वेगाने पसरू लागेल.
अशाप्रकारे करा सापाची ओळख -
कॉमन क्रॅट दिसायला काळा आणि तपकिरी रंगाचा आहे. त्याच्या शरीराची त्वचा चमकदार असते. त्याच्या तोंडापासून काही अंतरावर पांढरे डाग असतात. यानंतर शरीरावर शेपटीपर्यंत काही अंतरावर दोन पांढरे रेषा असतात. या सापांना उंदीर आणि बेडूक खायला आवडतात. त्यामुळे ते शेतातही दिसतात, असेही त्यांनी सांगितले.