TRENDING:

तिरुपती मंदिर ट्रस्टलाच गंडवलं, 6800000 किलो बनावट तूप विकून 250,000,000 रुपयांना चुना

Last Updated:

तिरुपती तिरुमला देवस्थानमध्ये २५० कोटींचा तुप घोटाळा, भोले बाबा डेअरीसह अनेक फर्म्सची भेसळ, CBI SIT तपासात धक्कादायक खुलासे, भाविकांमध्ये संताप.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिर तिरुपती तिरुमला देवस्थान यांनाच चुना लावल्याची घटना घडली आहे. भाविकांच्या जीवाशी खेळ करत मंदिराला लुटण्याचा प्रकार घडला आणि देशभरात खळबळ उडाली. प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचं तूप दिल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. तुपाच्या खरेदीमध्ये २५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं. CBI केलेल्या विशेष तपास पथकाच्या SIT चौकशीत अनेक हादरवणारे खुलासे झाले आहेत, ज्यामुळे TTD च्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
News18
News18
advertisement

दूध न घेणाऱ्या डेअरीने पुरवले ६८ लाख किलो तूप

या घोटाळ्यातील सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला. उत्तराखंडमधील एका डेअरीने ५ वर्षांच्या कालावधीत TTD ला ६८ लाख किलोग्राम तुपाचा पुरवठा केला, ज्याची किंमत अंदाजे २५० कोटी रुपये आहे. CBI च्या तपासात, या डेअरीने कधीही दूध किंवा लोण्याचा एक थेंबही कुठूनही खरेदी केला नव्हता.

advertisement

मग तूप कुठून आणि कसं दिलं? ज्या संस्थेने कधी दूध-लोणी खरेदी केले नाही, त्यांनी ५ वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात तुपाचा पुरवठा TTD ला कसा केला, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. TTD मध्ये या करोडो रुपयांच्या महाघोटाळ्याची वेळेत नोंद घेणारी कोणतीही व्यवस्था नव्हती का, असा सवाल भक्त आणि यंत्रणा विचारत आहेत.

advertisement

तुपात भेसळ आणि जनावरांची चरबी

हे तूप केवळ निकृष्ट दर्जाचंच नाही, तर त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ करण्यात आली होती. डेअरीचे प्रमोटर्स पामिल जैन आणि विपिन जैन यांनी बनावट देसी तूप उत्पादन युनिट उभे केलं. त्यांनी दूध आणि लोणी खरेदीची बनावट कागदपत्रे तयार केली. तपासात आरोपी अजय कुमार सुगंध याने SIT ला सांगितले की, तो डेअरीला मोनोडायग्लिसराइड्स आणि एसेटिक ॲसिड एस्टर यांसारखी रसायने पुरवत असे.

advertisement

हे पदार्थ तुपामध्ये बनावट पोत आणण्यासाठी वापरले जात होते. CBI च्या रिमांड रिपोर्टमध्ये आणखी गंभीर खुलासा झाला आहे की, तुपाच्या अनेक स्टॉकची निर्मिती जनावरांची चरबी मिसळून करण्यात आली होती. भ्रष्टाचार आणि निकृष्ट मालाच्या तक्रारीनंतर TTD ने २०२२ मध्ये ‘भोले बाबा डेअरी’ला ब्लॅकलिस्ट केले होते. मात्र, या डेअरी मालकांनी आपले कारनामे थांबवले नाहीत.

advertisement

ब्लॅकलिस्ट झाल्यानंतरही डेअरी मालकांनी अन्य तीन फर्म्सच्या नावावर निविदा मिळवून तुपाचा पुरवठा चालू ठेवला. यामध्ये वैष्णवी डेअरी (तिरुपती), माल गंगा डेअरी (उत्तर प्रदेश) आणि ए.आर. डेअरी फूड्स यांचा समावेश आहे. जुलै २०२४ मध्ये TTD ने 'ए.आर. डेअरी' कडून आलेले तुपाचे चार टँकर भेसळीमुळे नाकारले होते. मात्र, हे टँकर डेअरी प्लांटमध्ये परत न जाता, त्यांना थेट वैष्णवी डेअरीकडे पाठवण्यात आले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्यानंच नाव काढलं, केलं मालामाल,खुराक माहित आहे का?
सर्व पहा

हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने देशभरातील भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तिरुपती मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी प्रसादात अशी भेसळ होणे, हा धार्मिक भावनांशी खेळ असल्याचा आरोप केला जात आहे.

मराठी बातम्या/देश/
तिरुपती मंदिर ट्रस्टलाच गंडवलं, 6800000 किलो बनावट तूप विकून 250,000,000 रुपयांना चुना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल