TRENDING:

MP: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरून येणाऱ्या बस भीषण अपघात; जखमीला उपचारासाठी नागपूरात आणले, 10 जणांचा मृत्यू

Last Updated:

Tragic Bus Accident: मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे भीषण अपघातात बस आणि पिकअपची जोरदार धडक होऊन अनेकांचा मृत्यू झाला, तर 45 हून अधिक जण जखमी झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छिंदवाडा : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरून परतणारी बस उमरानाला आणि सिमरिया दरम्यान अपघातग्रस्त झाली. ही बस एका पिकअप वाहनाला धडकली असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे हा गंभीर अपघात झाला.
News18
News18
advertisement

या अपघातात 9 ते 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये 6 पुरुष, 3 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तर 45 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 20 हून अधिक जणांना ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात आणण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

advertisement

6 मृतदेह सापडले, अनेक जखमी

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने छिंदवाडा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथील सरकारी रुग्णालायत उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

advertisement

घटनास्थळी बचावकार्य

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले. वाहतूक थांबवून जखमींना सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवण्यात आले, त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याला भाव नाहीच, केळीची काय स्थिती? Video
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. तसेच प्रभावित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
MP: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरून येणाऱ्या बस भीषण अपघात; जखमीला उपचारासाठी नागपूरात आणले, 10 जणांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल