TRENDING:

मृत्यूआधी अखेरची चिठ्ठी अन् जिगरी मित्र अंत्ययात्रेसमोर DJ लावून नाचला, पण अख्खं गाव ढसाढसा रडलं; पाहा Video

Last Updated:

Unique Last Rite : सोहनलाल यांनी 2021 मध्येच एक भावनिक पत्र लिहून त्यांचे दोन जवळचे मित्र, अंबालाल प्रजापती आणि शंकरलाल पाटीदार यांना एक विशेष विनंती केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
friends danced in last rites of friend : मैत्रीची एक अनोखी आणि हृदयस्पर्शी गाथा मध्य प्रदेशातील मंदसौरमधून समोर आली आहे, जिथे एका मित्राने आपल्या दिवंगत मित्राच्या अंत्ययात्रेत नाचून त्याला निरोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अंत्ययात्रा थांबवून एक व्यक्ती नाचताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, पण यामागे एक भावनिक कारण आहे.
Unique Last Rite
Unique Last Rite
advertisement

पार्थिवापुढे नाचत निरोप द्या

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मंदसौर जिल्ह्यातील जवासिया गावातील आहे. येथे राहणारे सोहनलाल जैन यांचे 29 जुलै रोजी निधन झाले. विशेष म्हणजे, 2021 मध्येच सोहनलाल यांनी एक भावनिक पत्र लिहून त्यांचे दोन जवळचे मित्र, अंबालाल प्रजापती आणि शंकरलाल पाटीदार यांना एक विशेष विनंती केली होती. या पत्रात सोहनलाल यांनी म्हटले होते की, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत कोणीही रडू नये, उलट, त्यांच्या पार्थिवापुढे नाचत त्यांना निरोप द्यावा. सोहनलाल जैन यांनी पत्रात आपल्या मित्रांची माफी मागताना काही चूक झाली असल्यास क्षमा करावी, अशी विनंती देखील केली आहे.

advertisement

मी मेलो तर रडू नको...

सोहनलाल जैन यांच्या या भावनिक विनंतीचा मान राखत, 30 जुलै रोजी त्यांच्या अंत्ययात्रेत त्यांचे मित्र अंबालाल प्रजापती यांनी सोहनलाल यांची अंतिम इच्छा पूर्ण केली. त्यांनी अंत्ययात्रेच्या पुढे नाचत आपल्या मित्राला निरोप दिला. हा क्षण पाहून तिथे उपस्थित असलेले प्रत्येक जण भावुक झाले होते. मित्र प्रजापती म्हणाले, "सोहनलाल मला अनेकदा सांगायचे की जर मी मेलो तर रडू नको. माझ्या शेवटच्या प्रवासात नाच. मी माझ्या मित्राच्या शेवटच्या प्रवासात त्याच्या इच्छेनुसार नाचलो." तो भावनिकपणे म्हणाला, "मला मैत्री जपायची होती आणि मी ती शेवटपर्यंत जपली."

advertisement

मृत्यूनंतरही जपली मैत्री

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

दरम्यान, हा केवळ एक डान्स नव्हता, तर एका अतूट मैत्रीचे, वचनाचे आणि मृत्यूनंतरही जपलेल्या नात्याचे प्रतीक होते. सोहनलाल जैन यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्याऐवजी, त्यांच्या मित्रांनी त्यांना आनंद आणि संगीताने निरोप देऊन एक अविस्मरणीय उदाहरण दिलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
मृत्यूआधी अखेरची चिठ्ठी अन् जिगरी मित्र अंत्ययात्रेसमोर DJ लावून नाचला, पण अख्खं गाव ढसाढसा रडलं; पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल