TRENDING:

UPSC Results:ऋषीकेश आलासे राज्यात पहिला,महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी; टॉप 100 मध्ये 5 जणांची वर्णी

Last Updated:

UPSC Results Maharashtra Candidates: नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून देशभरातून 958 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. या निकालात महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांनी यश मिळवले असून पहिल्या 100 मध्ये राज्यातील पाच जणांचा समावेश आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये देशातील एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यात राज्यातील 60 हून अधिक उमदेवारांचा समावेश आहे.
News18
News18
advertisement

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वर्ष 2025 च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. ऋषीकेश आलासे 61,आकाश त्रिवेदी यांनी 73, गौरव चोपडा यांनी 83, सायली पगार यांनी 87 वा तर दिक्षा पाटकर यांनी 88 वा क्रमांक पटकावला आहे.

advertisement

यशस्वी उमेदवारांची यादी

हृषीकेश आलासे (६१) आकाश त्रिवेदी (७३) गौरव चोप्रा (८३) सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८), ऋतुजा गायकवाड (१०६), वरुण टोकस (११७), अंकिता अनिल पाटील (१४०), आर्यन सिरसीकर (१७५), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२४), शुभम शरद बेहेरे (२२६), ऋषिकेश पालिमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), अभिषेक ओझार्डे (३३६), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९), मनोज पाटील (४९३), विशाखा कदम (५०४), नंदिनी पाटील (५१२), रजत वाळके (५१४), निखिल तांबे (५१७), श्रुती चव्हाण (५२७), धनंजय दिघे (५२९), संकेत कुंभार (५३९), साईराज पाटील (५४५), आरुषा पाटील (५५३), पारस मिस्त्री (५५५), बापूसाहेब गायकवाड (५६१), प्रवीण कोळपे (५८४), अविष्कार डेर्ले (५९१), रोहित माळवेकर (६०१), अभिषेक टेकाडे (६१०), सिद्धार्थ तागड (६१९), भाग्यश्री नायकेले (६४७), शिवम वखारे (६५१), पांडुरंग कांबळी (६६०), अश्विनी कोळेकर (६७५), प्रज्वल नासरे (६७७), अल्पेश ढवळे (६८७), सूरज सूर्यवंशी (७०२), रामेश्वर शिंदे (७०५), बसवराज पाटील (७३९), प्रीतकुमार भाले (७४२), राजश्री देशमुख (७५४), चेतन ठाकरे (७६२), प्रांजली मेश्राम (७६७), मनीष झेंडे (७८८), प्रथमेश शिंदे (८१७), राहुल चांडोलकर (८३१), हेमकृष्ण पिसाडे (८४९), अतुल राजुरकर (८६३), रोहित सांगळे (८६५), सुरेश बोरकर (९१२), प्रेरणा खवले (९१३), अनिकेत अहिरे (९४१)

advertisement

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी ऑगस्ट 2025 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. डिसेंबर 2025- फेब्रुवारी 2026 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 958 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –317, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 104, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) - 306, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) - 158, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 73 उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 258 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 129, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 26, इतर मागास वर्ग -86, अनुसूचित जाती- 08, अनुसूचित जमाती - 06 उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण तीन दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

advertisement

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण 180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 74, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 18इतर मागास वर्ग (ओबीसी) –47, अनुसूचित जाती (एससी) – 28, अनुसूचित जमाती (एसटी) 13 जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

advertisement

भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण 55 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 22, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 06, इतर मागास वर्ग (ओबीसी) – 15, अनुसूचित जाती (एससी) – 08, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 04 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण 150 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 15, इतर मागास प्रवर्गातून - 42, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 22, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 11 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण 507 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 211, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 48 , इतर मागास प्रवर्गातून -141, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 73 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –34 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण 195 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 79, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 17 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - 61, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 27 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -11 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तांब्यालाही चमकावलं,सगळंच संपत चाललं, तांबट आळीतल्या स्नेहलताईंची कहाणी
सर्व पहा

एकूण 348 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

मराठी बातम्या/देश/
UPSC Results:ऋषीकेश आलासे राज्यात पहिला,महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी; टॉप 100 मध्ये 5 जणांची वर्णी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल