नेमकं काय घडलं?
26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बाडमेर जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी म्हणून टीना डाबी यांनी तिरंग्याची दोरी खेचली आणि राष्ट्रध्वज फडकवला. मात्र, ध्वज फडकवल्यानंतर नेमक्या कोणत्या दिशेला तोंड करून मानवंदना (Salute) द्यायची, याबाबत त्या काही क्षणांसाठी गोंधळलेल्या दिसल्या.
सुरक्षारक्षकाचा तो 'इशारा' अन् व्हिडिओ व्हायरल
advertisement
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, टीना डाबी ध्वज फडकवल्यानंतर चुकीच्या दिशेला वळू लागल्या. त्यांच्या मागे उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाच्या हे तातडीने लक्षात आलं. त्या रक्षकाने हळूच हाताने इशारा करून मॅडमला योग्य दिशा सांगितली आणि मग त्यांनी वळून तिरंग्याला सॅल्युट केला. हा काही सेकंदांचा गोंधळ कॅमेऱ्यात कैद झाला आणि बघता बघता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
नेटकऱ्यांनी लावली 'क्लास'
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर या व्हिडिओवर संतप्त आणि टिका करायला सुरुवात केली.
@CuteAar:uhi4 नावाच्या युजरने लिहिले, "ह्या आहेत बाडमेरच्या डीएम टीना डाबी, ज्या यूपीएससी टॉपर आहेत. पण मॅडम हेच विसरल्या की सॅल्युट कुठे करायचा आहे. कदाचित त्यांना कॅमेऱ्याची इतकी सवय झाली आहे की, जिथे कॅमेरा दिसतो तिकडेच त्या वळतात."
तर दुसऱ्या एका युजरन म्हटले की, "जेव्हा अधिकारी 'रील स्टार' बनतात, तेव्हा प्रोटोकॉलचं भान राहत नाही."
टीना डाबी या नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि त्यांच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, या घटनेनंतर इंटरनेटवर एक नवीन वाद सुरू झाला आहे. काहींच्या मते, इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा मूलभूत प्रोटोकॉलची चूक होणे अपेक्षित नाही. तर दुसरीकडे, त्यांचे समर्थक असे म्हणत आहेत की, माणूस म्हटला की चूक होऊ शकते आणि तो केवळ काही सेकंदांचा गोंधळ होता.
प्रशासकीय अधिकारी हे जनतेचे रोल मॉडेल असतात. त्यामुळे त्यांच्याकडून होणारी छोटीशी चूकही मोठी मानली जाते. टीना डाबी यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्याकडून झालेली ही चूक त्यांना आता महागात पडताना दिसत आहे.
