पिलीभीत : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी शेतात गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर मृतदेह महामार्गावर ठेवून ग्रामस्थांनी आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांना शांत करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांची मागणी ऐकून आश्चर्य व्यक्त केले. अनेक तासांनंतर नुकसान भरपाई आणि तारांचे कुंपण देण्याच्या आश्वासनावर ग्रामस्थांनी चक्का जाम आंदोलन रद्द केले.
advertisement
गेल्या 7-8 महिन्यांपासून उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात मानवभक्षक वाघांचा धुमाकूळ सुरू आहे. कालीनगर तालुक्याला या वाघाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कालीनगर तालुक्यातील मथना जब्ती, राणीगंज, पुरैनी दीपनगर आणि जामुनियासह 5 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या सर्व गावांना मानवभक्षकांच्या भीतीने जगावे लागत आहे.
26 ऑक्टोबर रोजीच या भागातील अटकोना गावातून एका वाघिणीची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर बरोबर 10 व्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. या सर्व घटनांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पिलीभीत-माधोटांडा महामार्गावर मृतदेह ठेवून अनेक तास निदर्शने केली.
Health News : अशी वनस्पती ज्याची पानं, फुलं आहेत रामबाण उपाय, ब्रेन ट्यूमरसुद्धा होईल गायब
50 लाख घ्या आणि -
दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच माधोतांडा पोलिसांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळी हजर झाले. याच काळात पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाच्या महोफ रेंजचे रेंजर सहेंद्र यादव यांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गावातील लोक तुम्हाला 10 लाख रुपये गोळा करुन देतील, तुम्ही तुमचा जीव द्याल का? अशी अजब मागणीही यावेळी संतप्त गावकऱ्यांनी केली. तसेच 50 लाख रुपये खर्चून वाघाला मारू द्यावे, अशी परवानगी अनेकांनी मागितली.
6 महिन्याती चौथी घटना -
दरम्यान, ही अशी पहिली घटना नाही. तर याठिकाणी याआधी मागील 6 महिन्यातील ही चौथी घटना आहे. त्यामुळेच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांबद्दल रोष दिवसेंदिवस वाढत आहे.