Health News : अशी वनस्पती ज्याची पानं, फुलं आहेत रामबाण उपाय, ब्रेन ट्यूमरसुद्धा होईल गायब
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आयुर्वेद चिकित्सक डॉ. अनुराग अहिरवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आयुर्वेदात भटकटैया या वनस्पतीला कंटकारी असे म्हणतात.
अर्पित बडकुल, प्रतिनिधी
दमोह : मध्यप्रदेश राज्याच्या बुंदेलखंड परिसरात सामान्यपणे मिळणाऱ्या भटकटैया वनस्पतीला आयुर्वेदात कंटकारी या नावाने ओळखले जाते. भटकटैया या वनस्पतीचे फूल, फळ, पाने, मूळ याचेही फायदे सांगण्यात आले आहेत. या वनस्पतीचे सेवन करण्याआधी तिला धुवून घ्यावे. ही वनस्पती दाट झुडुपाच्या स्वरूपात जमिनीवर पसरलेली असते. आयुर्वेद चिकित्सक डॉ. अनुराग अहिरवार यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
हे आहेत फायदे -
या वनस्पतीला पाहिल्यावर असे वाटते की, जसे की, रागावलेली नागीण अंगावर पुष्कळ काटे घेऊन "मला कोणीही हात लावू नकोस" अशी गर्जना करत आहे. त्या वनस्पतीवर इतके काटे असतात की, तिला स्पर्श करणे कठीण आहे. म्हणूनच याला दुस्पर्श असेही म्हणतात. दमा, खोकला, ताप, कृमी, दातदुखी, डोकेदुखी, मूत्राशयातील दगड, नपुंसकता, नाकातून रक्त येणे आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांवर या औषधी वनस्पतीच्या मुळाचा उपयोग होतो.
advertisement
भटकटैया वनस्पती ब्रेन ट्यूमरच्या उपचारावरही खूप फायदेशीर आहे. ही वनस्पती मेंदूतील ट्यूमरमुळे होणाऱ्या कुशिंग रोगाच्या लक्षणांपासून आराम देते. कुशिंग रोग हा मेंदूतील पिट्यूटरी ग्रंथीतील गाठीमुळे होतो. सिलिबिनिन नावाचा मुख्य सक्रिय पदार्थ भटकटैया या काटेरी वनस्पतीच्या दुधाच्या बियांमध्ये आढळतो. या वनस्पतीचा उपयोग ट्यूमरच्या उपचारात केला जातो. याच्या मुळाचा उपयोग अनेक प्रकारच्या औषधांमध्येही केला जातो.
advertisement
आयुर्वेद चिकित्सक डॉ. अनुराग अहिरवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आयुर्वेदात भटकटैया या वनस्पतीला कंटकारी असे म्हणतात. या वनस्पतीचा उपयोग आजही ग्रामीण भागात खोकला, दमा, ताप आणि दातदुखीसाठी केला जातो. या वनस्पतीची फळे भाजून घेता येतात. बियांचा धूर श्वास घेतल्याने दातदुखी आणि दात किडण्यापासून खूप आराम मिळतो. याच्या मुळाचा उपयोग किडनी स्टोन या आजारावरही केला जातो. तसेच त्याचा चांगला परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
सूचना - ही माहिती तज्ञांशी झालेल्या चर्चेच्या आधारावर आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Madhya Pradesh
First Published :
January 07, 2024 10:25 AM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Health News : अशी वनस्पती ज्याची पानं, फुलं आहेत रामबाण उपाय, ब्रेन ट्यूमरसुद्धा होईल गायब