पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा पती चार्टर्ड अकाउंटंट आहे. महिलेने मुलासह बाल्कनीतून उडी मारली तेव्हा तो दुसऱ्या खोलीमध्ये होता. आरडाओरडा ऐकल्यानंतर महिलेचा पती बाल्कनीच्या दिशेने धावला, तेव्हा त्याला पत्नी आणि मुलगा जमिनीवर पडलेले आढळले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
महिलेने लिहिलेली चिठ्ठी ही तिच्या पतीला उद्देशून असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हा निर्णय घेण्यासाठी महिलेने कुणालाही जबाबदार धरलेलं नाही. आता आपल्याला कुणालाही त्रास द्यायचा नाही, असं महिला तिच्या चिठ्ठीमध्ये म्हणाली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आई मुलाबद्दल अत्यंत चिंतेत होती. वडिलांनी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पत्नीला मुलाला औषध द्यायला सांगितलं होतं, असंही पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. नोएडामध्ये घडलेल्या या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
advertisement
