TRENDING:

सौमित्र खान, मुस्लिम नाही हिंदू; कपाळावर टिळा आणि हातात कलावा, मोदींवरील हल्ल्याच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत

Last Updated:

Saumitra Khan:संसदेतील गोंधळावरून पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचा गंभीर आरोप करणारे भाजप खासदार सौमित्र खान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळेच नव्हे, तर त्यांच्या नाव, धर्म आणि राजकीय प्रवासामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: संसदेच्या अधिवेशनादरम्यान बुधवारी झालेल्या अभूतपूर्व गोंधळावरून भाजप खासदार सौमित्र खान यांनी विरोधकांवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले असताना, विरोधकांनी ज्या प्रकारे गोंधळ घातला, तो केवळ निषेध नसून पंतप्रधानांवर शारीरिक हल्ला करण्याचे षडयंत्र होते, असा दावा खान यांनी केला. त्यानंतर आज गुरुवारी मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. दरम्यान विरोधक मोदींवर हल्ला करतील असा आरोप करणारे खासदार सौमित्र खान आहेत तरी कोण? जाणून घेऊयात.
News18
News18
advertisement

भाजप खासदार सौमित्र खान सध्या मोदींवर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याने चर्चेत आले असले तरी अशा प्रकारे त्यांचे नाव चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने पश्चिम बंगालमधील बिष्णुपूर लोकसभा मतदारसंघातून सौमित्र खान यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या जात–धर्माबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. ‘खान’ हे आडनाव असल्याने अनेकांना ते मुस्लिम असल्याचा गैरसमज झाला. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे.

advertisement

भाजपाने 2019च्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील मलप्पुरम मतदारसंघातून अब्दुल सलाम या एकमेव मुस्लिम उमेदवारास तिकीट दिले होते. मात्र ‘खान’ आडनाव असल्यामुळे सौमित्र खान यांनाही मुस्लिम समजले गेले आणि भाजपाने दोन मुस्लिम उमेदवार दिल्याची चर्चा रंगली होती.

सौमित्र खान यांचा धर्म आणि जात काय?

सौमित्र खान मुस्लिम नसून हिंदू आहेत. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1980 रोजी पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील दुर्लभपूर येथे झाला. ते शुनरी जातीतील बंगाली हिंदू कुटुंबातून येतात. त्यांचे वडील धनंजय खान आणि आई छाया राणी खान आहेत. ‘खान’ हे आडनाव त्यांना आई-वडिलांकडूनच मिळाले आहे. स्थानिक पातळीवर त्यांच्या नावाचा उच्चार ‘सौमित्र खा’ असा केला जातो, मात्र इंग्रजीत ते Saumitra Khan असे लिहिले जाते. सौमित्र खान अनुसूचित जातीत (SC) मोडतात. ते कपाळावर टिळा आणि हातात कलावा घालताना अनेकदा दिसतात.

advertisement

सौमित्र खान यांचा राजकीय प्रवास

सौमित्र खान सध्या बिष्णुपूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली आणि काँग्रेसच्या तिकिटावर आमदारही झाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरातील सर्वच खातील आवडीने, बनवा चवदार सोयाबीन पकोडे, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

2013 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये ते टीएमसीचे खासदार म्हणून निवडून आले. बिष्णुपूर हा मतदारसंघ दीर्घकाळ कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. 1971 ते 2014 या काळात येथे कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. मात्र, 2014 मध्ये सौमित्र खान यांनी कम्युनिस्टांचा ४३ वर्षांचा राजकीय अंमल संपवला. 2019, 2024 मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली.

advertisement

मराठी बातम्या/देश/
सौमित्र खान, मुस्लिम नाही हिंदू; कपाळावर टिळा आणि हातात कलावा, मोदींवरील हल्ल्याच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल