पत्रकार परिषदेत लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालकांनी भारताने केलेल्या कारवाईत १०० दहशतवादी आणि पाकिस्तान लष्कराचे ४० जवान ठार झाल्याचे सांगितले. भारतीय लष्कराने पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनावर कठोर भूमिका घेतली असून, याबाबत अधिकृत इशारा दिला आहे. लष्कराने सांगितले की, पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार नाही. आज रात्री पुढे काय घडतंय ते पाहू. पण कुठलेही पुढील उल्लंघन झाल्यास आमचं उत्तर अत्यंत तीव्र असेल, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे.
advertisement
भारताने फक्त एक गोष्ट करावी, आम्ही पाकिस्तानला नष्ट करू; BLAचे पत्र
आमचा संघर्ष पाकिस्तान लष्कराशी नव्हे, दहशतवाद्यांशी
भारताने केलेली सैनिकी कारवाई ही पाकिस्तान लष्कराविरोधात नव्हती. तर ती केवळ दहशतवाद्यांविरोधात केंद्रित होती, असे एअर मार्शल ए.के. भारती यांनी स्पष्ट केले.
आमचा संघर्ष पाकिस्तानच्या लष्कराशी किंवा सीमेपलीकडील कोणत्याही अधिकृत घटकाशी नव्हता. आमचं लक्ष्य फक्त दहशतवादी होते. आम्ही ज्या दहशतवाद्यांना निष्प्रभ करायचं ठरवलं, त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यानंतर फक्त आमची हवाई संरक्षण व्यवस्था सक्रिय ठेवली, असे त्यांनी सांगितले.