हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही, तर भारताच्या ग्रामीण भागात अजूनही पाळंमुळं घट्ट रोवून असलेल्या अंधश्रद्धेचे दर्शन घडवणारा एक आरसा आहे. टीझरची सुरुवात एका रहस्यमय मेळाव्याने होते, जिथे लोक आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. टीझरमधील सर्वात धक्कादायक दृश्य म्हणजे, एक तांत्रिक एका मानवी मृतदेहाचे लचके तोडून खाताना दिसतोय.
advertisement
दुसऱ्या लग्नात बेभान होऊन नाचली अपूर्वा नेमळेकर, पूर्वा शिंदेसोबत धरला ठेका, नवरा बघतच राहिला; VIDEO
टीझरमध्ये एक काळजाचा थरकाप उडवणारा संवाद आहे, "चरकमध्ये प्रेतांचा बळी का दिला जातो?" त्यावर समोरून उत्तर येतं, "देवाची इच्छा असेल तर आम्ही आमच्या काळजाचा तुकडाही कापून देऊ शकतो." श्रद्धेचं हे अघोरी स्वरूप पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल.
तगडी स्टारकास्ट आणि वास्तवाचे चटके
या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अंजली पाटील मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत साहिदुर रहमान, सुब्रत दत्ता आणि नलनीश नील यांसारखे ताकदीचे कलाकार महत्त्वाच्या पात्रांत दिसणार आहेत. शिलादित्य मौलिक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, 'पेन स्टुडिओ'चे जयंतीलाल गडा या प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. ही कथा कोणत्याही काल्पनिक विश्वातील नसून, भारतीय दुर्गम भागातील तांत्रिक प्रथा आणि अंधभक्तीच्या सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.
मानवी मानसिकतेचा भयानक कोपरा
निर्माता सुदीप्तो सेन या चित्रपटाबद्दल म्हणतात, "भारतीय तांत्रिक आणि गूढ विश्वाला जागतिक स्तरावर नेण्याची माझी इच्छा होती. हा चित्रपट मानवी मानसिकतेच्या त्या खोलवरच्या कोपऱ्याचा शोध घेतो, जिथे साधारण माणसं गूढ परिस्थिती आणि नैतिक पेचप्रसंगात अडकतात." 'चरक' मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा त्याग, भक्ती आणि अंधश्रद्धेतील धूसर रेषा अधोरेखित करते.
