मंदिरांना पाण्याचा वेढा, 8 बंधारे पाण्याखाली
दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. पुराचे पाणी घाटांपर्यंत पोहोचले आहे. कोल्हापूर पद्धतीचे उंबरे, आव्हे, पटवर्धन कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, विष्णूपद, अजवसोंड आणि बठाण हे आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
advertisement
झोपडपट्टीत पाणी शिरण्याची शक्यता, पिकांचे नुकसान
नदीतील पाण्याचा वाढता प्रवाह पाहता प्रशासनाने व्यासनारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागण्याची शक्यता वर्तवली आहे. दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे भीमा नदी आता धोक्याची पातळी ओलांडत आहे. गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी शिरले असून, पिकांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. चंद्रभागेला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासन पूर्णपणे सतर्क झालं आहे. पुराचे हे पाणी अंबाबाई पटांगणातील व्यासनारायण झोपडपट्टीत जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना आधीच सावध केलं आहे.
हे ही वाचा : पुराचे पाणी ओसरले! राधानगरी धरणाचे दरवाजे बंद; पावसामुळे 23 घरांचे नुकसान, 9 लाखांचा फटका!
हे ही वाचा : Mowad Flood: महाराष्ट्रातलं आख्खं गावच वाहून गेलं, 204 जणांना जलसमाधी, 35 वर्षांपूर्वीचा 'तो' भयानक दिवस!