पुराचे पाणी ओसरले! राधानगरी धरणाचे दरवाजे बंद; पावसामुळे 23 घरांचे नुकसान, 9 लाखांचा फटका!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेला पावसाचा जोर आता कमी झाला आहे, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. धरण क्षेत्रातही पाऊस मंदावल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे...
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता कमी झाला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती, त्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला असून, राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. सध्या पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने घट होत आहे.
अजूनही 47 बंधारे पाण्याखालीच...
मंगळवारी दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी दहा इंचांनी घटली. रात्री 9 वाजता ती 34 फूट 11 इंचांवर होती. 6 बंधारे खुले झाले असून अजूनही 47 बंधारे पाण्याखाली आहेत. शहरात दिवसभर ऊन आणि पावसाचा खेळ सुरू होता. दुपारी तीनच्या सुमारास शहराच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, पण त्यानंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. सायंकाळनंतर अधूनमधून हलक्या सरी पडत होत्या. दरम्यान, राधानगरी परिसरात मात्र मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
advertisement
4 राज्यमार्ग, 7 जिल्हा मार्ग पाण्याखाली
जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू निवळत असली तरी, अजूनही 4 राज्यमार्ग आणि 7 जिल्हा मार्ग पाण्याखाली आहेत. या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे. एसटी बस सेवाही एका मार्गावर अजूनही विस्कळीत आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील 23 घरांची पडझड झाली आहे. यामुळे सुमारे 8 लाख 95 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. पुराचे पाणी आता नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत ओसरले आहे.
advertisement
हे ही वाचा : Weather Alert: महिनाअखेर बदलली हवा, पश्चिम महाराष्ट्रातून मोठं अपडेट, आजचा हवामान अंदाज
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2025 9:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
पुराचे पाणी ओसरले! राधानगरी धरणाचे दरवाजे बंद; पावसामुळे 23 घरांचे नुकसान, 9 लाखांचा फटका!