Weather Alert: महिनाअखेर बदलली हवा, पश्चिम महाराष्ट्रातून मोठं अपडेट, आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. आज पुणे, सातारा घाट भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. आज 30 जुलै रोजी संपूर्ण विदर्भासह कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरींची शक्यता आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. घाटमाथ्यावर आणि धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. मागील 24 तासात पुणे जिल्ह्यात 2.1 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानाचा पारा 27.5 अंश सेल्सिअसवर होता. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच उर्वरित पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement