कोल्हापूरच्या महिलांना 'उमेद'ची आशा, बचत गटांना मिळणार का कष्टाची बाजारपेठ?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने राज्य सरकारने 'उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान' अंतर्गत 10 जिल्ह्यांमध्ये....
कोल्हापूर : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाच्या ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’अंतर्गत राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होण्याची दाट शक्यता असल्यामुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या चळवळीला मोठी चालना मिळणार आहे.
महिला बचत गटांच्या चळवळीत कोल्हापूर आघाडीवर
महाराष्ट्रामध्ये महिला बचत गटांच्या चळवळीत कोल्हापूर जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला आहे. जिल्ह्यातील काही बचत गटांची उत्पादने तर राष्ट्रीय स्तरावरही पोहोचली आहेत. एकट्या जिल्हा परिषदेकडेच 27 हजार 758 बचत गट नोंदणीकृत आहेत. या बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात.
बचत गटांना व्यवसाय वाढीसाठी विशेष प्रोत्साहन
दरवर्षी जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीने भव्य 'ताराराणी महोत्सव' आयोजित केला जातो. या महोत्सवात जिल्ह्यासह राज्यातील अनेक बचत गट सहभागी होतात आणि येथे लाखो रुपयांची उलाढाल होते. याशिवाय, सणांच्या निमित्तानेही जिल्हा परिषदेमार्फत बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. आठवड्यातून दोन दिवस तर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच 'उमेद' अंतर्गत बचत गटांना व्यवसाय वाढीसाठी विशेष प्रोत्साहन मिळते.
advertisement
मॉलसाठी निकष आणि अटी असणार
मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याचा निर्णय झाला असून, त्यासाठी जिल्हा परिषदांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या मॉलसाठी जे निकष आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत, त्या सर्व निकषांची पूर्तता कोल्हापूर जिल्हा परिषद करते. यामुळे, उमेद मॉलसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होण्याची शक्यता खूप जास्त आहे. या संदर्भातील प्रस्ताव लवकरच जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
advertisement
हे ही वाचा : महिला बचत गटांसाठी मोठी बातमी, १० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल, २०० कोटींचा निधी, कॅबिनेटचा निर्णय
हे ही वाचा : Weather Alert: महिनाअखेर बदलली हवा, पश्चिम महाराष्ट्रातून मोठं अपडेट, आजचा हवामान अंदाज
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2025 8:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरच्या महिलांना 'उमेद'ची आशा, बचत गटांना मिळणार का कष्टाची बाजारपेठ?