TRENDING:

Thane BJP Shiv Sena Clash : पक्ष फोडाफोडीनंतर आता हाणामारी, ठाण्यात शिंदेच्या शाखाप्रमुखाला भाजप नेत्याने हाणलं

Last Updated:

Thane BJP Shiv Sena Clash : एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदेंच्या शाखाप्रमुखाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पक्ष फोडाफोडीनंतर आता हाणामारी, ठाण्यात शिंदेच्या शाखाप्रमुखाला भाजप नेत्याने हाणलं
पक्ष फोडाफोडीनंतर आता हाणामारी, ठाण्यात शिंदेच्या शाखाप्रमुखाला भाजप नेत्याने हाणलं
advertisement

ठाणे: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यावरून जोरदार वाद सुरू आहेत. भाजप आणि शिंदे गटात सुरू असलेल्या हा सुप्त संघर्ष दिल्ली दरबारी पोहचला. पक्ष फोडता फोडता आता रस्त्यावरही भाजप-शिंदे गटात राडे सुरू झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदेंच्या शाखाप्रमुखाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

advertisement

ठाणे शहरात शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा रस्त्यावर आले आहे. भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास, बीएसयूपी (BSUP) योजनेअंतर्गत घरांच्या नोंदणी शुल्क कमी करण्याच्या निर्णयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या शाखेत जल्लोष करण्यात आला होता. याच दरम्यान माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शाखाप्रमुख हरेश महाडीक आणि कार्यकर्ते महेश लाहने यांना अडवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

advertisement

या घटनेनंतर महाडीक आणि लाहने यांनी थेट नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. घटनास्थळी राजकीय तणाव वाढल्याने काही वेळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

advertisement

ठाण्यात सध्या स्थानिक निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच घडलेल्या या घटनेमुळे शिवसेनाभाजप संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पुढील काही तासांत पोलिसांकडून अधिकृत गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता असून, या वादामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जिथं रक्त सांडलं, तिथंच फिरवला बुलडोझर, छ. संभाजीनगरात धडक कारवाई, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Thane BJP Shiv Sena Clash : पक्ष फोडाफोडीनंतर आता हाणामारी, ठाण्यात शिंदेच्या शाखाप्रमुखाला भाजप नेत्याने हाणलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल