TRENDING:

Sonal Chauhan: ईशा गुप्तानंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री मायदेशी परतली, भारतात येताच पंतप्रधानांचे मानले आभार

Last Updated:

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली. त्यामुळे तिथल्या विमानतळावर अनेक भारतीय अडकले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली. त्यामुळे तिथल्या विमानतळावर अनेक प्रवासी अडकले आहेत. या अडकलेल्या प्रवाशांमध्ये अनेक बॉलिवू़ड सेलिब्रिटींचाही समावेश होता. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान सुद्धा अडकली होती. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ती दुबईतून भारतात परतत असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्रीची पोस्ट पाहून चाहत्यांकडून आनंदाचा वर्षाव केला आहे.
bollywood actress sonal chauhan returns to india from dubai amid Israel Iran war crisis
bollywood actress sonal chauhan returns to india from dubai amid Israel Iran war crisis
advertisement

बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहानने ती दुबईमध्ये अडकल्याची पोस्ट शेअर केली होती. परंतु ती आता ओमानमार्गे भारतात परतली आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर विमानतळाचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये "कमिंग होम" हे म्युझिक बॅकग्राऊंडला लावलेले आहे. सोनलने तिच्या मागील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना केली होती, ज्यात तिने लिहिले होते, "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, युद्धामुळे मी दुबईमध्ये अडकले आहे. विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत आणि भारतात परतण्याचा कोणताही मार्ग नाही. घरी सुरक्षित प्रवासासाठी मी सरकारकडे मदत मागते. कोणत्याही मदतीसाठी मी आभारी राहीन."

advertisement

Sonal Chauhaan Post

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा तर तेजीतच, आल्याला आणि लिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

सोनलचा मध्य पूर्वेमध्ये अडकलेल्या इतर अनेक सेलिब्रिटींमध्ये समावेश होता. ज्यात ईशा गुप्ताचाही समावेश होता. ईशा अलिकडेच भारतात परतली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरून चाहत्यांना ही महत्त्वाची माहिती दिली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोनल सुद्धा आता मुंबईत परतली आहे. अभिनेत्रीसोबतच तिच्या कुटुंबानेही सरकारचे आभार मानले आहेत. दुबई सरकारने अभिनेत्रीला कारने ओमानला पाठवले, त्यानंतर पुढे अभिनेत्री विमानाने भारतात परतली आहे. सोनल चौहानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच मिर्झापूर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झालं असून आता दिग्दर्शकांकडून चित्रपटाच्या एडिटचं काम सध्या सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Sonal Chauhan: ईशा गुप्तानंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री मायदेशी परतली, भारतात येताच पंतप्रधानांचे मानले आभार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल