TRENDING:

Buldhana News : मोबाईल हॅक केला अन् शिक्षिकेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ब्लॅकमेल करून नराधमाचा अत्याचार, बुलढाणा हादरलं

Last Updated:

Buldhana News: बुलढाण्यात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून तिचे खासगी फोटो चोरले आणि तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल खंडारे, प्रतिनिधी, बुलढाणा : डिजीटल काळात आपली खासगी माहिती सुरक्षित आहे का, याची चर्चा अनेकदा होत असते. मोबाईल हॅक करून बँक खात्यावर डल्ला मारण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, बुलढाण्यात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून तिचे खासगी फोटो चोरले आणि तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
AI Image: मोबाईल हॅक केला अन् शिक्षिकेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ब्लॅकमेल करून नराधमाचा अत्याचार, बुलढाणा हादरलं
AI Image: मोबाईल हॅक केला अन् शिक्षिकेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ब्लॅकमेल करून नराधमाचा अत्याचार, बुलढाणा हादरलं
advertisement

मोबाईल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका विवाहित शिक्षिकेला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून त्यातील खासगी फोटो आणि व्हिडिओच्या जोरावर तिला विवस्त्र होण्यास भाग पाडून तिचे शोषण करणाऱ्या २७ वर्षीय नराधमावर सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश गिरी असे या फरार आरोपीचे नाव आहे.

advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शिक्षिका असून आरोपी ऋषिकेश गिरी याने तिचा मोबाईल हॅक केला. हॅकिंगद्वारे त्याने तिच्या व्हॉट्सॲप चॅट्स, ईमेल आणि गॅलरीमधील खासगी फोटो व व्हिडिओवर ताबा मिळवला. हे फोटो पती आणि नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी त्याने शिक्षिकेला दिली.

ब्लॅकमेलिंग आणि अत्याचार

धमकावून आरोपीने पीडितेशी व्हिडिओ कॉल करून तिला विवस्त्र होण्यास भाग पाडले. इतकेच नाही, तर त्या व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते पीडितेच्या बहिणीलाही पाठवले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर "माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीस, तर तुला आणि तुझ्या मुलाला ठार मारीन," अशी धमकी त्याने दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने हिंमत एकवटली आणि पोलिसांत धाव घेतली.

advertisement

पोलिसांकडून गुन्हा दाखल, आरोपी पसार...

घटनेचे गांभीर्य ओळखून सोनाळा पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवली आहेत. आरोपी ऋषिकेश गिरी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS 2023) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BNS ७५(१), ७५(२), ७७, ७८, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३५६(२) या कलमानुसार, तर माहिती तंत्रज्ञान कायदा ६६(E), ६७, ६७(A)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Buldhana News : मोबाईल हॅक केला अन् शिक्षिकेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ब्लॅकमेल करून नराधमाचा अत्याचार, बुलढाणा हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल