TRENDING:

Dombivli News: गुढीपाडवा आणि स्वागत यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, कल्याण- डोंबिवलीतील पर्यायी मार्ग कोणते? पाहा यादी

Last Updated:

कल्याण- डोंबिवली शहरामध्ये गुढीपाडवा सणानिमित्त नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते. या स्वागत यात्रेनिमित्त ठाणे पोलिसांनी शहरात मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण- डोंबिवली: डोंबिवलीकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. डोंबिवलीमध्ये गुढीपाडवा सणानिमित्ताने नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते. या स्वागत यात्रेनिमित्त ठाणे पोलिसांनी 19 मार्चला, गुरूवारी शहरात वाहतुक बदल लागू केले आहेत. गुरूवारी पहाटे 4 वाजेपासून हे वाहतुक बदल लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं वाहन घेऊन घराबाहेर पडणार असाल, तर एकदा ही बातमी आवश्य वाचा. नेमकं कोणकोणत्या रस्त्यावर वाहतुकीसाठी बंदी केली आहे? कोणते पर्यायी मार्ग असणार आहेत? एकदा जाणून घेऊयात...
News18
News18
advertisement

डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी (गुरूवार- 19 मार्च 2026) सकाळी 06:30 वाजता डोंबिवली पूर्वेतील श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व यांच्या वतीने स्वागतयात्रा भागशाळा मैदान, डोंबिवली पश्चिम येथुन सुरू होऊन कोपर ब्रिज मार्गे शिवमंदीर रोड- चार रस्ता बाजीप्रभु चौक, फडके रोड आणि डोंबिवली पूर्व येथे येणार आहे. यावेळी बाजी प्रभु चौक, फडके रोड, मदन ठाकरे चौक, गणपती मंदिर, आप्पा दातार चौक येथे गुढीपाडवा सणानिमित्त नववर्ष स्वागतयात्रे करिता महिला, नागरिक, तरूण, तरूणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुढीपाडवा सण साजरा करतात. स्वागतयात्रेत लेझीम पथक सनई चौघडा, भजन, दिंड्या, अनेक चित्ररण तसेच सर्व प्रांतीय परिवार, संप्रदाय, समाज मंडळे समाविष्ठ होणार आहेत.

advertisement

सदर स्वागतयात्रेमुळे लो. टिळक नौक, गणपती मंदिर रोड, छेडा रोड, फडके रोड, मदन ठाकरे चौक, बाजीप्रभु चौक, मॉडर्न कॅफे, चिंतामणी ज्वेलर्स समोरील रोड, आगरकर रोड, आय. डी. बी. आय बँके समोरील रोड या भागात वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहणे सामान्य जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी (गुरूवार- 19 मार्च 2026) सकाळी 06:30 नववर्ष स्वागतयात्रा भागशाळा मैदान ते फडके रोड मार्गे निघणार आहे. या दरम्यान फडके रोड, बाजीप्रभु चौक, मदन ठाकरे चौक परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, डोंबिवली वाहतूक उपविभाग पोलिसांनी परिसरातील वाहतुक सुरळीत राहण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

advertisement

दरम्यान, डोंबिवली वाहतूक उपविभाग पोलिसांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर कोणकोणत्या परिसरातील रस्त्यांची वाहतुक सुरू राहिल आणि बंद असेल? याची अपडेट शेअर केलेली आहे. ठाणे शहराचे वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, हे निर्बंध पहाटे 04:00 ते दुपारी 01:00 वाजेपर्यंत लागू राहतील. कल्याण डोबिंवली महानगरपालिकेच्या फडके रोडवरील बाजीप्रभु चौक ते आप्पा दातार चौक पर्यंत येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांकरीता संपुर्ण फडके रोड, एम.एस.ई.बी. कार्यालय, वृंदावन हॉटेल, अंबिका हॉटेल, मदन ठाकरे चौकास दुतर्फा, बाबासाहेब जोशी पथ कॉस रोड आणि सावरकर रोड कॉस रोड येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या सर्व मार्गांवरील वाहनं ठाकुर्ली स.वा. जोशी हायस्कुल समोरील रोडने नेहरू रोड मार्गे डोंबिवली स्टेशन कडे तसेच फडके रोडकडे येणारी वाहने ही लो. टिळक रोडने, सावरकर रोडने स्व. इंदीरा चौक मार्गे आणि डोंबिवली स्टेशन परिसरातून पुढे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत.

advertisement

छत्रपती शिवाजी महाराज सर्कल डोबिंवली पूर्व येथुन कल्याण रोडने लो. टिळक चौककडे येणाऱ्या खाजगी बसेस आणि अवजड वाहनांकरीता छत्रपती शिवाजी महाराज सर्कल डोबिंवली पुर्ववरून 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या सर्व मार्गांवरील खाजगी बसेस आणि अवजड वाहने घरडा सर्कल येथे यु- टर्न घेऊन पुढे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. नेहरू रोड आणि गणेश मंदिर रोडवरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गणेश मंदिर गेट आणि नेहरू कॉस रोड येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या सर्व मार्गांवरील सर्व वाहने नेहरू रोडने पुढे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. छेडा रोडने गणेश मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तुलसी स्वीट कॉर्नर आणि छेडा कॉस रोडवर 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या मार्गांवरील सर्व वाहने गणेश मंदिर रोडवरून पुढे आपटे रोड, शिवाजी पथ आणि डॉ. मुखर्जी पथ मागने इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. पी. पी. चेंबर्स कडून फतेह अली रोडवरून फडके रोडकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पी. पी. चेंबर्स येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या मार्गांवरील सर्व वाहने चिपळुणकर रोडने पुढे केळकर रोड, स्वामी विवेकानंद रोड आणि राज रोडमार्गे नेहरू रोडने इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत.

advertisement

स्वागतयात्रा नाना शंकरशेठ रोड येथुन पुढे जात असताना नाना शंकर शेठ रोडकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सम्राट चौकात 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या मार्गांवरील सर्व वाहने घ. गुप्ते कॉस रोड, म. गांधी रोड आणि रेतीबंदर रोडवरून इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. स्वागतयात्रा दिनदयाळ रोडने म.गांधी रोडने दिशेने जात असताना रेतीबंदर रोडकडुन सम्राट अशोक चौकमार्गे दिनदयाळ चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सप्ताट अशोक चौकामध्ये 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या मार्गांवरील सर्व वाहने घनश्याम गुप्ते क्रॉस रोड, रेतीबंदर रोडने, ठाकुरवाडी मुंब्रा देवी रोडवरून इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. म. गांधी रोडने प. दिनदयाल रोडमार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प. दिनदयाळ चौक येगे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या मार्गांवरील सर्व वाहने म. गांधी रोडने घनश्याम गुप्ते रोड, म. फुले रोड आणि सुभाष रोडवरून पुढे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. स्वागतयात्रा कोपर ब्रिज येथे आल्यांनतर डोंबिवली पश्चिमेकडून कोपर ब्रिजवरून डोंबिवली पूर्वेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोपर ब्रिज येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. म. फुले रोदने बावन चाळ, नवीन ठाकूर्ली ब्रिजवरून डावीकडे वळण घेऊन व्ही. पी. रोडने पुढे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
सर्व पहा

छत्रपती शिवाजी महाराज सर्कल डोंबिवली पूर्व येथून कल्याण रोडने टिळक चौकमार्गे येणारी के.डी.एम.टी आणि एन.एन.एम.टी च्या बसेससाठी लो. टिळक रोडवर 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या मार्गांवरील सर्व के.डी.एम.टी आणि एन.एन.एम.टी बसेस आर.पी.रोड मार्गे चार रस्ता पाटणकर चौकातून डावे वळण घेऊन मानपाडा रोडवरून पुढे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. नववर्षाच्या स्वागत यात्रेच्या काळात फडके रोडवरील बाजी प्रभु चौक ते आप्पा दातार चौक दरम्यानच्या रस्त्यावर 'नो पार्किंग' क्षेत्र म्हणून घोषित केला गेला आहे. ठाणे शहराचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, हे निर्बंध पहाटे 04:00 ते दुपारी 01:00 वाजेपर्यंत लागू राहतील. हे सर्व वाहतूकीचे नियम पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Dombivli News: गुढीपाडवा आणि स्वागत यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, कल्याण- डोंबिवलीतील पर्यायी मार्ग कोणते? पाहा यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल