TRENDING:

तुम्हीही जोडीदाराचा टुथब्रश वापरता? प्रेम तर नाही, पण HIV चा धोका नक्कीच वाढेल

Last Updated:

बहुतेक घरांमध्ये असे आढळते की घरातील लोक एकमेकांचे टुथब्रश वापरतात. मात्र असे करणे ओरल हेल्थच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आपण आपल्या भावंडांसह अनेक गोष्टी शेअर करत असतो. आपल्याला पालकांकडूनही सर्व गोष्टी मिळून-मिसळून वापरण्यास शिकवले जाते. एकमेकांच्या गोष्टी वापरणे किंवा त्यांच्यासोबत अन्न वाटून खाणे ही चांगली सवय मानली जाते. मात्र जेव्हा गोष्ट टुथब्रशची असते, तेव्हा आपली हीच सवय त्रासदायक ठरू शकते. बहुतेक घरांमध्ये असे आढळते की घरातील लोक एकमेकांचे टुथब्रश वापरतात. मात्र असे करणे ओरल हेल्थच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.
बहुतेक घरांमध्ये असे आढळते की घरातील लोक एकमेकांचे टुथब्रश वापरतात. मात्र असे करणे ओरल हेल्थच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.
बहुतेक घरांमध्ये असे आढळते की घरातील लोक एकमेकांचे टुथब्रश वापरतात. मात्र असे करणे ओरल हेल्थच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.
advertisement

डेंटिस्ट डॉक्टर निशा ठक्कर यांनी सांगितल्यानुसार आपल्या तोंडात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. जेव्हा आपण आपले ब्रश घरातील इतर कोणत्याही सदस्याबरोबर शेअर करतो तेव्हा या बॅक्टेरियांचे आदान-प्रदान होते. यामुळे ओरल हेल्थसंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात. आज आपण तज्ज्ञांकडूनच या सवयीमुळे होणारे नुकसान समजून घेऊया.

झोपताना उशी घ्यावी की नाही, तुम्हीही आहात कंफ्यूज? तज्ज्ञांनी काय सांगितलं पाहा

advertisement

इतरांसोबत आपला टूथब्रश का शेअर करू नये?

तुम्ही तुमचा टूथब्रश इतरांसोबत शेअर केल्याने तुम्ही त्यात असलेले बॅक्टेरियाही इतरांसोबत शेअर करता. अशा टूथब्रशमुळे हिरड्यांचे आजार आणि तोंडाच्या गंभीर संसर्गाचा धोका वाढतो. टूथब्रश शेअर केल्याने तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया संबंधित व्यक्तीकडे हस्तांतरित होऊ शकतात आणि त्याचे ओरल हेल्थ बिघडू शकते.

तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, टूथब्रशवर स्ट्रेप्टोकोकस म्युटान्स आढळतात. हा एक हानिकारक जीवाणू आहे जो अनेक प्रकारच्या संसर्ग आणि दात किडण्यासाठी जबाबदार आहे. जेव्हा तुम्ही टूथब्रश इतरांसोबत शेअर करता तेव्हा हानिकारक संसर्ग होण्याची शक्यता असते.

advertisement

रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खाताय? रोजचा आहाराच देईल या गंभीर आजाराला निमंत्रण

टूथब्रश शेअर केल्याने तोंडाच्या कोणत्या आजारांचा धोका वाढू शकतो?

  • तोंडात आढळणाऱ्या काही बॅक्टेरियांमुळे न्यूमोनियासारखे संक्रमण होऊ शकते. टूथब्रश शेअर केल्याने हे जीवाणू पसरण्याचा धोका वाढतो.
  • लाळेद्वारे सामान्य सर्दी किंवा फ्लूसारखे काही विषाणू पसरू शकतात. टूथब्रश शेअर केल्याने हा विषाणू संबंधित व्यक्तीमध्ये पसरण्याची शक्यता वाढते आणि त्या व्यक्तीलाही हा आजार होऊ शकतो.
  • advertisement

  • काहीवेळा ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते, जे लक्षात येत नाही. जेव्हा आपण एखाद्यासोबत टूथब्रश शेअर करतो तेव्हा एचआयव्ही आणि हिपॅटायटीस बी सारखे रक्त प्रवाहाचे आजार देखील हस्तांतरित होऊ शकतात.

जर तुम्ही तुमचा ब्रश कोणाबरोबरही शेअर केला नाही तर तुम्ही तोंडाचे आरोग्य चांगले ठेवू शकता. टूथब्रश शेअर केल्याने जवळीकीची भावना येते पण त्यामुळे दोन व्यक्तींचे आरोग्यही बिघडू शकते.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
तुम्हीही जोडीदाराचा टुथब्रश वापरता? प्रेम तर नाही, पण HIV चा धोका नक्कीच वाढेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल