TRENDING:

गणेशाचं अर्धनारीश्वर रूप माहिती आहे का? वाचा काय आहे नेमकी कथा

Last Updated:

भगवान गणेशानेदेखील अर्धनारीश्वराचं रूप धारण केलं होतं

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 14 सप्टेंबर: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, घरोघरी या उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांमध्ये दर वर्षीप्रमाणे यंदा उत्साहाचं वातावरण दिसत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी मंडळाचे कार्यकर्ते सज्ज होत आहेत. गणरायाच्या विविध रूपांच्या मूर्ती गणेशोत्सवात पाहण्यास मिळतात; पण तुम्हाला माहिती आहे का, भगवान गणेशानेदेखील अर्धनारीश्वराचं रूप धारण केलं होतं.
News18
News18
advertisement

समृद्ध जीवनासाठी करा स्नानाचे हे उपाय, स्नानाचे 4 प्रकार आणि सर्वोत्तम वेळ

हिंदू देवतांमध्ये फक्त भगवान शंकरालाच अर्धनारीश्वर म्हटलं गेलं आहे. भगवान शंकराच्या अर्ध्या भागात शक्तीच्या रूपात देवी पार्वती वास करते, असं म्हटलं जातं. परंतु फार कमी जणांना माहिती आहे, की भगवान गणेशानेदेखील अर्धनारीश्वराचं रूप धारण केलं होतं. पौराणिक कथांमध्ये याचा उल्लेख असून, त्यानुसार अंधकासुर या राक्षसाचा वध करण्यासाठी गणेशानं एका स्त्रीचं रूप धारण केलं होतं, ज्याला गणेशी किंवा विनायकी रूप म्हणतात.

advertisement

अंधकासुराचा वध

‘जेव्हा अंधकासुर राक्षसाने सर्व सृष्टीला त्रास देण्यास सुरुवात केली, तेव्हा सर्व देव भगवान शंकराकडे गेले. सर्व देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केल्यानंतर शंकराने अंधकासुराचा वध केला; पण अंधकासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या वाहत्या रक्तामुळे मोठं संकट उभं राहिलं होतं. त्यामुळे हे वाहतं रक्त पिण्यासाठी 200 देवी प्रकट झाल्या होत्या. त्यापैकी एक भगवान गणेशाचं स्त्री रूप असल्याचं म्हटलं जातं.’

advertisement

तसंच मत्स्यपुराण आणि विष्णू धर्मोत्तर पुराणानुसार, देवी पार्वतीला अंधक राक्षसापासून वाचवताना भगवान शंकराचा त्रिशूळ हा देवी पार्वतीलाच लागला होता. त्यामुळे जमिनीवर पडलेलं रक्त अर्धं मादी आणि अर्धं नर असं विभागलं गेलं, ज्याला गणेशानी असं म्हणतात. लिंग पुराण आणि दुर्गा उपनिषद यांसारख्या धार्मिक ग्रंथांमध्येही गणेशाच्या स्त्री रूपाचा उल्लेख आहे.

काय आहे धार्मिक मान्यता?

advertisement

धार्मिक मान्यतेनुसार ज्याप्रमाणे भगवान विष्णूची शक्ती वैष्णवी, भगवान शिवाची शक्ती शिवा, भगवान ब्रह्माची शक्ती ब्राह्मणी आहे, त्याचप्रमाणे भगवान गणेशाची शक्ती गणेश्वरी आहे. या शक्तीची भगवान गणेशासोबत अर्धनारीश्वर रूपात पूजा केली जाते. नारी गणेशाला गणेशी, गजानना, हस्तिनी, गणेशवारी, गणपती हृदय, वैनायकी, विघ्नेश्वरी, श्री अयांगिनी, महोदरा, गजवक्त्रा, लंबोदरा, महाकाया इत्यादी नावांनीही ओळखलं जातं.

advertisement

आयुष्यात कधीही शोक करत नाहीत असे लोक, भगवद् गीतेतील अनमोल विचार

इथे सापडली मूर्ती

भगवान गणेशाच्या अर्धनारीश्वर स्वरूपाच्या मूर्तीही अनेक ठिकाणी आढळून आल्या आहेत. यापैकी एक दुर्मीळ मूर्ती राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात हर्ष मंदिरात आहे. ही मूर्ती सुमारे 1050 वर्षं जुनी आहे. हर्ष इथे हल्ला करत औरंगजेबानं ही मूर्ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, असं सांगितलं जातं.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
गणेशाचं अर्धनारीश्वर रूप माहिती आहे का? वाचा काय आहे नेमकी कथा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल