समृद्ध जीवनासाठी करा स्नानाचे हे उपाय, स्नानाचे 4 प्रकार आणि सर्वोत्तम वेळ

Last Updated:

आयुर्वेदानुसार सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तापूर्वीचे तास अंघोळीसाठी योग्य आहेत

News18
News18
मुंबई, 13 सप्टेंबर:  स्नान हा आपल्या दैनंदिन कर्मांचा एक अविभाज्य भाग आहे. लोक कधीकधी गंमतीने विचारतात की, अंघोळीसाठी योग्य वेळ आहे का? तथापि, पारंपरिक आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्व देणार्‍या जुन्या पिढ्यांतील लोकांच्या मते, आपल्या अंघोळीची वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते. स्वतःच्या स्वच्छतेवर परिणाम करणारे घटक म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त.
आयुर्वेदानुसार सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तापूर्वीचे तास अंघोळीसाठी योग्य आहेत. शरीराच्या महत्त्वाच्या क्रियांपैकी स्नान ही महत्त्वाची बाह्य क्रिया आहे. परंपरेनुसार अंघोळ आणि इतर क्रिया केल्यावर शरीराबरोबरच मनही ताजेतवाने होते.
धर्मशास्त्रानुसार संस्कृतमधील एक प्राचीन धार्मिक ग्रंथात वेगवेगळ्या कालावधीसाठी ('यम') विविध प्रकारचे स्नान निर्दिष्ट केले आहेत. ते म्हणजे 'मुनिस्नानम्', 'देवस्नानम्', 'मनुष्यस्नानम्' आणि 'राक्षसस्नानम्'.
advertisement
मुनिस्नानम्
पहाटे 4 ते 5 या वेळेत केलेल्या स्नानाला मुनिस्नान किंवा संतांचे स्नान म्हणतात. स्वतःला स्वच्छ करण्यासाठी ही सर्वात योग्य वेळ मानली जाते. या काळात अंघोळ केल्याने आनंद, उत्तम आरोग्य, प्रतिकारशक्ती, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि एकाग्रता यांचा आनंद घेता येतो.
देवस्नानम्
सकाळी 5 ते 6 या वेळेत शरीराची स्वच्छता करणे याला देवस्नान म्हणतात. ताजेतवाने होण्यासाठी हीसुद्धा एक चांगली वेळ आहे कारण ती तुम्हाला कीर्ती, समृद्धी, मानसिक शांती आणि आरामदायी जीवनाचा आनंद देते.
advertisement
मानवी स्नान
हे मानवाचे स्नान आहे आणि वेळ सकाळी 6 ते 8 दरम्यान आहे. धर्मशास्त्र सांगते की, या तासांमध्ये जे आपले शरीर धुतात त्यांच्यासाठी सौभाग्य, ऐक्य आणि आनंद वाट पाहत असतात.
राक्षस स्नान
सकाळी 8 नंतर अंघोळ करणे शक्यतो टाळावे. जर तुम्ही सकाळी 8च्या आधी स्वतःला स्वच्छ करू शकत नसाल तर सूर्यास्ताच्या आधी तसे करा. प्राचीन शास्त्रानुसार सकाळी 8 वाजता किंवा नंतर स्नान केल्याने अडचणी, धनहानी आणि गरिबी येते. पुरातन काळातील लोक सूर्योदयापूर्वी अंघोळ करून आपली सर्व दिनचर्या सुरू करत असत.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
समृद्ध जीवनासाठी करा स्नानाचे हे उपाय, स्नानाचे 4 प्रकार आणि सर्वोत्तम वेळ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement