सोमवारी सोप्या उपायांनी करा देवाधिदेवाची पूजा, घरात राहील प्रसन्नता
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
शास्त्रानुसार सोमवार हा भगवान शिव (महादेव) यांना समर्पित दिवस आहे
मुंबई, 17 सप्टेंबर: हिंदू धर्मात भगवान महादेवाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार भगवान शिव जेवढे कठोर तेवढेच भोळेही आहेत. हिंदू धर्मात सर्व देवी-देवतांची विशिष्ट दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे. शास्त्रानुसार सोमवार हा भगवान शिव (महादेव) यांना समर्पित दिवस आहे.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक सोमवारी उपवास करतात. सोमवारी भगवान शंकराच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते. भगवान शिवाच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी मंदिरात जाऊन भगवान शंकराच्या शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करावे. या दिवशी दुग्धाभिषेकालाही खूप महत्त्व आहे.
advertisement
सोमवारचे व्रत सोमवारच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. यासोबत सोमवार व्रताची कथाही करावी. व्रत कथेशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही. भगवान शंकराची पूजा कशी करायची ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. सोमवारच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाची पूजा करावी. या दिवशी भगवान भोलेनाथांना पाणी, दूध, बेलपत्र, फुले इत्यादी अर्पण करा. यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा आणि आरती करा.
advertisement
या दिवशी तिसऱ्या प्रहरपर्यंत उपवास असतो. तसेच, सोमवारच्या उपवासात फळ किंवा पारणे असा काही विशेष नियम नाही. संपूर्ण दिवसाच्या तिसऱ्या प्रहरानंतरच अन्न प्राशन केले जाते. सोमवारचे उपवास तीन प्रकारचे आहेत. आपल्या इच्छेनुसार आपण प्रत्येक सोमवारी व्रत करू शकता, त्यासोबत सोम्य प्रदोष आणि 16 सोमवार व्रतदेखील ठेवू शकता. तिन्ही व्रतांची पद्धत सारखीच आहे.
advertisement
शिवपूजनानंतर कथा श्रवण करणे आवश्यक आहे. संध्याकाळी देवाची पूजा करून आरती केली जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2023 2:33 PM IST