जाणून घेऊयात अंड कशाप्रकारे खाणं आरोग्यासाठी फायद्याचं आहे ते.
उकडलेलं अंड खाण्याचे फायदे
उकडलेले अंड्यात त्यात तेल आणि मसाले नसल्याने ते पचायला सोपं असतं. त्यात कॅलरीज कमी असतात आणि प्रथिने भरपूर असतात. उकडलेलं अंडं खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारायला मदत होते. जर तुम्हाला पोटाचे काही विकार असतील तर उकडलेलं अंडं हे आरोग्यासाठी फायद्याचं आहे. उकडलेल्या अंड्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण अधिक असतं. एका अंड्यामध्ये साधारण 5.3 ग्रॅम प्रथिनं आढळून येतात. याशिवाय, त्यात व्हिटॅमिन बी12, डी, ए आणि लोह आणि जस्त सारख्या खनिजे आढळून येतात. याशिवाय अंड्याच्या पिवळ्या बलकात कॅलरीज् ही आढळून येतात. त्यामुळे शरीरीला उर्जा मिळू शकते. ज्यांना वजन वाढवायचं आहे ते अंड्यातला पिवळा बलक खाऊ शकतात. मात्र तुम्ही जर जीमला जात असाल आणि तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं आहे तर अंड्याताल पिवळा बलक खाणं टाळा. उकडलेल्या अंड्यातून पिवळा बलक वेगळा करणं सहज शक्य असतं.
advertisement
तळलेलं अडं / ऑम्लेट खाण्याचे फायदे
तुम्हाला अंड्यासोबत फायबर्स,जीवनसत्त्वं आणि खनीजे हवी असतील तर तुम्ही अंड्यामध्ये कांदा आणि टोमॅटो किंवा तुमच्या आवडीनुसार भाज्या, मसाले टाकून त्याचा स्वाद वाढवू शकतात. त्यासोबतच शरीराला ऊर्जा देखील मिळेल.
अडं की ऑम्लेट? काय फायद्याचं?
जर तुम्ही वजन कमी करत असाल किंवा कमी कॅलरी आहार घेत असाल तर उकडलेले अंडे सर्वोत्तम आहे. मात्र तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर बटर किंवा तूप घालून बनवलेलं ऑम्लेट खाल्ल्याने कॅलरीज आणि वजन वाढायला मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला स्नायू वाढवायचे असतील किंवा ऊर्जा मिळवायची असेल तर ऑम्लेट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
