Disadvantages of Eggs: बापरे, ऐकावं ते भयंकरच! अंडी खाल्ल्याने येतो पॅरेलिसीसचा झटका ?
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Disadvantages of eggs in Marathi: अंडी ही शरीरासाठी फायद्याची जरी असली तरीही अंड्यांचा अतिरेक हा शरीरासाठी घातक ठरू शकतो. दररोज अतिप्रमाणात अंड्यांचं सेवन केल्याने ब्रेनस्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेजचा धोका वाढू शकतो.
मुंबई : ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.’ हे वाक्य अंड्याच्या बाबतीत तंतोतंत लागू ठरतं. आत्तापर्यंत आपण अंड्याचे अनेक फायदे पाहिले होते. अंडी ही उष्ण प्रकृतीची असल्याने ती थंडीत खाणं फायद्याचं ठरतं. अंड्यात असलेल्या प्रथिनांमुळे अनेक बॉडी बिल्डर्स स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अंडी खातात. कारण अंड्यामध्ये प्रोटिन्स व्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी 5 अशी विविध जीवनसत्त्वं आढळून येतात. सेलेनियम, फॉस्फरस आणि झिंक सोबतच अंड्यामध्ये ओमेगा 3 ॲसिड आढळून येतं. त्यामुळे अंडी खाल्ल्याने शरीराला आवश्यक त्या पोषक तत्वांची पूर्तता होऊन शरीर फिट राहायला मदत होते.
मात्र असं असलं तरीही अंड्याचा अतिरेक हा शरीरासाठी घातक ठरू शकतो. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे की, अंडी खाल्ल्याने अर्धांगवायू म्हणजेच पॅरेलिसीसचा झटका येऊ शकतो. तुम्ही दररोज अतिप्रमाणात अंड्यांचं सेवन करत असाल तर तुम्हाला ब्रेनस्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेजचा धोका वाढू शकतो आणि हे आम्ही तर संशोधकांचा अहवाल सांगतो.
advertisement
काय आहे अहवालात ?
हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार, रोज एक अंडं खाणं शरीरासाठी फायद्याचं आहे. मात्र तुम्ही त्यापेक्षा जास्त प्रमाणात अंड्याचं सेवन करत असाल तर तुम्हाला संभाव्या धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे रक्तातल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढून त्याचा विपरीत परिणाम रक्तवाहिन्या आणि हृदयावर होऊन हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. अंड्याच्या पिवळ्या बलकात फॅट्सचं प्रमाण अधिक असतं जे वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरून अन्य आजारांना निमंत्रण देऊ शकतं.
advertisement
कोणी किती अंडी खावीत ?
शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, हृदयविकार आणि कोलेस्टेरॉलचा त्रास असेलल्या रूग्णांनी जास्त अंडी खाऊ नयेत. याशिवा ज्यांना डायबिटीस, किडनीचे आजार आहेत अशा व्यक्तींनी अंड्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अंड्याचं सेवन नियंत्रित प्रमाणात करावं. जीमला जाणाऱ्या व्यक्ती ज्याप्रमाणे फक्त प्रोटिन्स मिळवण्यासाठी जसा अंड्यांचा पांढरा भाग खातात आणि पिवळा बलक फेकून देतात. तशा पद्धतीने अंड खाल्ल्यास फायदा होऊ शकतो.
advertisement
आठवड्यातून 3 ते 4 अंडी खाणं हे कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. मात्र तुम्हाला यापेक्षा जास्त प्रमाणात अंडी खायची असतील तर त्यापूर्वी डॉक्टांचा सल्ला नक्की घ्या. अन्यथा गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय ज्या लोकांना अंड्याची ऍलर्जी आहे त्यांनीसुद्धा अंडी खाणं टाळावं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 03, 2025 1:48 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Disadvantages of Eggs: बापरे, ऐकावं ते भयंकरच! अंडी खाल्ल्याने येतो पॅरेलिसीसचा झटका ?