Healthy Tips : रक्ताचा स्पॉट असलेलं अंड खाल्लं तर चालतं का? याचे शरीरावर काय होतात परिणाम?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Health Tips : काही लोक हा डाग असलेला भाग काढून टाकून अंड वापरतात, तर काही लोक ते अंड पूर्ण फेकून देतात. अशात प्रश्न असा उपस्थीत रहातो की असं अंड असेल तर काय करायचं? ते नक्की खायचं की नाही?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
साधारणपणे, 1 टक्के अंड्यातील पिवळ्या भागामध्ये असे रक्ताचे डाग असतात. अंडी बाजारात आणण्यापूर्वी त्यांची कॅन्डलिंग पद्धतीने चाचणी केली जाते. अंड्यातील पिवळ बलकाच्या आतील भागाची तीव्र प्रकाशाने तपासणी केली जाते आणि त्यात रक्ताचे डाग असलेली अंडी तेथे टाकून दिली जातात. परिणामी, अशी अंडी क्वचितच कोणाला मिळतात.
advertisement
तथापि, पांढऱ्या कवच असलेल्या अंड्यांपेक्षा तपकिरी कवच असलेल्या अंड्यांमध्ये रक्ताचे डाग असलेले अंड्यातील पिवळ बलक असण्याची शक्यता जास्त असते. कारण तपकिरी कवचाचा रंग अनेकदा डाग झाकतो. परिणामी, चाचणी दरम्यान ते आढळत नाही. कधीकधी अंड्याच्या पांढऱ्या भागात रक्ताचे डाग देखील दिसू शकतात. यामुळे शरीराला कोणतीही हानी होत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
advertisement


