मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास एका कारमध्ये स्फोट झाला. लाल किल्ल्याच्या गेट नंबर १ जवळ हा स्फोट झाला.
advertisement
स्फोट झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोट झााल्यानंतर कारला आग लागली. याा आगीमध्ये जवळील ३ ते ४ गााड्यांंना आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक माहिती अशी की, दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आणखी तीन गाड्यांना आग लागली आहे. अग्निशमन दलाने सांगितलं की, त्यांना कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली असून, दलाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा स्फोट कशामुळे झाला त्याबद्दल मात्र अद्याप कळू शकलं नाही.
पोलिसांनी काय दिली माहिती?
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ अतिशय शक्तिशाली स्फोट झाला आहे. स्फोटाचा प्रकार अजून स्पष्ट झालेला नाही. DCP स्पेशल सेलसह पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिसराला वेढा घालण्यात आला आहे. स्फोटाचे कारण आणि स्वरूप जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे.
लाल किल्ला स्फोटस्थळी फॉरेन्सिक आणि तांत्रिक तज्ज्ञ दाखल
लाल किल्ला परिसरात झालेल्या जोरदार स्फोटानंतर फॉरेन्सिक आणि तांत्रिक तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले आहेत. हे तज्ज्ञ स्फोटाचा प्रकार आणि त्यामागील कारण शोधण्यासाठी तपास करत आहेत. सुरक्षादलांनी परिसराला वेढा घातला असून, पोलिस आणि केंद्रीय एजन्सींचे अधिकारीही तपासात सहभागी झाले आहेत. प्राथमिक तपासानंतरच स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
घटनास्थळी NIA आणि NSGच्या टीम दाखल
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर आता केंद्रीय तपास संस्था NIA आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) यांच्या टीम घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. दोन्ही पथके लवकरच स्फोटाच्या ठिकाणी पोहोचून कारण आणि स्वरूपाची तपासणी करतील. यापूर्वी फॉरेन्सिक आणि तांत्रिक तज्ज्ञांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, सुरक्षा यंत्रणांनी परिसर पूर्णपणे बंद केला आहे. दिल्ली पोलिस आणि केंद्रीय एजन्सींचा संयुक्त तपास सध्या सुरू आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
