TRENDING:

बाप रे! मोठा मासा आला अन् तोंडात धरलं जलपरीचं डोकं, VIDEO पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

Last Updated:

चीनच्या जिशुआंगबन्ना येथे एका जलप्रदर्शनादरम्यान रशियन जलनर्तिकेवर मोठ्या माशाने अचानक हल्ला केला. ती माशाच्या तोंडात अडकली पण प्रसंगावधान राखत स्वतःला वाचवले. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
एका मोठ्या माशाने मत्स्यपरीचा पोशाख घातलेल्या रशियन महिलेवर हल्ला केला. त्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. ज्यात महिलेवर अचानक एका मोठ्या माशाने हल्ला केला. तिचं नृत्य बघायला आलेल्या पर्यटकांनाही या हल्ल्याने धक्का बसला. पण व्हिडिओच्या शेवटीपर्यंत पाहिल, तर ती महिला सुखरुप असल्याचं दिसतं.  पण सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडिओ खूपच भीतीदायक वाटत आहे. रील पाहून, एकीकडे युजर्स या परिस्थितीत महिला कलाकाराच्या धैर्याचे कौतुक करत आहेत. दुसरीकडे, लोक 'माशाने तिला फक्त test करण्याचा प्रयत्न केला' असेही लिहित आहेत. मात्र, माशाला दात नव्हते. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
News18
News18
advertisement

ही घटना आहे चीनमधील घटना...

Ladbible वेबसाइटनुसार, 22 वर्षीय रशियन मत्स्यपरी ॲनिमेटर चीनमधील जिशुआंगबन्ना येथील एका ॲक्वेरिअममध्ये performance करत असताना चित्रित करण्यात आली. जिथे तिला पाहण्यासाठी प्रेक्षकही उपस्थित होते. या performance दरम्यान, एका मोठ्या माशाने महिलेवर हल्ला केला. त्यामुळे ती घाबरली, पण तिने हिंमत दाखवत महिलेने लगेचच तिचं तोंड माशाच्या तोंडातून बाहेर काढलं. सुमारे 6 सेकंदाचा व्हिडिओ इथेच संपतो. पण या व्हिडिओने इंस्टाग्राम युजर्सला खूप मोठा धक्का दिला आहे आणि आता ते या घटनेवर कमेंट करून आपले विचार व्यक्त करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, जिशुआंगबन्ना प्रिमिटिव्ह फॉरेस्ट पार्कवर ॲक्वेरिअममध्ये घडलेली घटना 'लपवण्याचा' प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

advertisement

2 कोटी 19 लाखांहून अधिक व्ह्यूज 

ही रील @meerkat.mediaa नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आली आहे. या व्हिडीओला 2 कोटी 19 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 3.5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पोस्टवर 6.5 हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. मासा महिलेला गिळण्याचा प्रयत्न करत आहे, हे पाहून युजर्स या व्हिडिओवर जोरदार कमेंट्स करत आहेत.

advertisement

मासा फक्त तिला test करू इच्छित होता

लोक म्हणतात की, वन्य प्राण्यांवर इतका विश्वास ठेवू नये. एका व्यक्तीने पोस्टवर कमेंट करत लिहिले, जेव्हा तुम्ही वन्य प्राण्यांवर विश्वास ठेवता तेव्हा असंच होतं. दुसर्‍या युजरने म्हटले की, मासा फक्त तिला test करू इच्छित होता. आणखी एका युजरने म्हटले की शेवटी त्याला मत्स्यपरीच्या नैसर्गिक शिकारींपैकी एक पाहण्याची संधी मिळाली.

advertisement

हे ही वाचा : ना झाडं, ना प्राणी, फक्त भयान शांतता... हे भुताटकीचं गाव आहे तरी कुठं? जिथे 200 वर्षांपूर्वी अचानक गायब झाले गावकरी

हे ही वाचा : 66 कोटी वर्षांपूर्वीची माशाची सापडली उलटी! शास्त्रज्ञ म्हणाले, 'हा शोध तर...'

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
बाप रे! मोठा मासा आला अन् तोंडात धरलं जलपरीचं डोकं, VIDEO पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल