समृद्ध जीवनासाठी करा स्नानाचे हे उपाय, स्नानाचे 4 प्रकार आणि सर्वोत्तम वेळ
श्री गणरायाच्या आवडीची पाच फळं
श्री गणपतीला प्रामुख्याने लाडू आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो; पण ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या मते, अशी पाच फळं आहेत जी गणरायाला विशेष प्रिय आहेत. त्यात केळी, पेरू, सीताफळ, बेल आणि जांभळांचा समावेश आहे. श्री गणेशाच्या पूजेवेळी या फळांचा नैवेद्य दाखवून त्यांचं वाटप केलं तर सर्व प्रकारचे रोग, दुःख आणि दोष दूर होतात आणि घरात सुख व समृद्धी नांदते. तसंच जन्मकुंडलीत बुध ग्रह प्रतिकूल असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम नाहीसा होतो.
advertisement
आयुष्यात कधीही शोक करत नाहीत असे लोक, भगवद् गीतेतील अनमोल विचार
अशा प्रकारे प्रसन्न होतो श्री गणराय
पाच फळांव्यतिरिक्त इतर उपायांद्वारेही गणरायाला प्रसन्न करता येतं. यासाठी तुम्ही श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता. गणपतीला मोदक विशेष प्रिय आहेत. श्री गणेशाच्या पूजेत मोदक अनिवार्य मानले जातात. तसंच साधा, मोतिचुराचा लाडूदेखील गणरायाला विशेष प्रिय आहे. याशिवाय बेसन, नारळ, तीळ किंवा रव्याच्या लाडवांचा नैवेद्यही गणपतीला दाखवतात. श्री गणरायाला दूर्वा विशेष प्रिय आहेत. ओम् गं गणपतये नमः किंवा इतर कोणत्याही पौराणिक मंत्राचा जप करत एक-एक दूर्वा श्री गणपतीला अर्पण केली तर संबंधित व्यक्तीची ज्ञानसंपदा वाढते. तसंच शेंदूर, झेंडूचं फूल, सुपारी, हळकुंड, जानवं या वस्तूदेखील गणरायाला अर्पण करतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)