छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एका कॉम्प्लेक्स मधील तब्बल वीज दुकानात नऊ ते दहा फुटांपर्यंत पाणी साचल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालंय लोकल ग्राउंड झिरो वरून दुकान मालकांचा दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहूयात.
15 आणि 16 सप्टेंबर च्या रात्री जालना शहरात रात्री बाराती सकाळी तीन वाजेपर्यंत अवघ्या तीन तासात तब्बल 116.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने शहरभर दाना दान उडाली. अनेक ठिकाणी दुकानांनी पाणी शिरलं. रस्ते जलमय झाले. अनेकांना रात्र जागून काढावी लागली. शहरातील ऑर्किड टावर या कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या वीस दुकानात नऊ ते दहा फुटांपर्यंत पाणी शिरलं. किर्ती सागर नावाच्या लेडीज वेअर दुकानाचं तब्बल दोन कोटी रुपयांचं नुकसान या पावसामुळे झालं.
advertisement
सिद्धिविनायक नावाच्या सीसीटीव्ही दुकानांमध्ये असलेल्या कॅमेऱ्याचं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान तब्बल तीन ते चार कोटी मधील आहे. तर एका इलेक्ट्रॉनिक दुकानदाराने मोठ्या मेहनतीने आपलं दुकान उभं केलं होतं. तब्बल 25 लाख रुपयांचं इलेक्ट्रॉनिक्स सामान या दुकानदाराचं पाण्यात बुडाल्याने खराब झालं. महानगरपालिकेने उन्हाळ्यामध्ये नालेसफाई अभियान राबवलं. परंतु कागदोपत्री घोडे नाचवल्यामुळे ग्राउंडवर नालेसफाई झालीच नाही. त्यामुळेच नाल्यातील पाणी कॉम्प्लेक्स मध्ये आल्याचा आरोप कीर्तीसागर दुकान मालक ललित कोटेच्या यांनी लोकल एटीन बरोबर बोलताना सांगितलं