उन्हाळ्यात स्मार्टफोन गरम होण्यापासून वाचवण्यासाठी 5 टिप्स
- थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा : फोन कारच्या डॅशबोर्डवर किंवा उन्हात उघड्यावर ठेवू नका. यामुळे फोन लवकर गरम होऊ शकतो.
- जास्त क्षमतेचे ॲप्स वापरणे टाळा : गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि मोठे ॲप्स उन्हाळ्यात फोनला जास्त गरम करतात. त्यांचा वापर कमी वेळेसाठीच करा.
- बॅटरी सेव्हिंग मोड सुरू करा : हा मोड प्रोसेसरवरील भार कमी करतो आणि फोन गरम होण्याची शक्यता कमी होते.
- फोन थंड ठिकाणी ठेवा : फोन थंड खोलीत किंवा सावलीच्या ठिकाणी ठेवा. गरज वाटल्यास फोन बंद करून थोडा वेळ ठेवा.
- बॅकग्राउंड ॲप्स बंद करा : बॅकग्राउंडला जास्त ॲप्स चालू ठेवल्याने सीपीयूवर लोड वाढतो, ज्यामुळे फोन गरम होऊ शकतो.
advertisement
advertisement
चार्जिंग करताना या 7 चुका करू नका
- डुप्लिकेट किंवा लोकल चार्जरचा वापर करू नका :स्वस्त आणि बनावट चार्जरमुळे फोन जास्त गरम होऊ शकतो किंवा फुटूही शकतो.
- चार्जिंग करताना गेम खेळणे किंवा व्हिडिओ पाहणे : चार्जिंग आणि प्रोसेसिंग एकाच वेळी सुरू असल्याने फोन जास्त गरम होतो.
- चार्जिंग करताना फोन उशी किंवा कपड्यांखाली ठेवणे : यामुळे उष्णता बाहेर पडायला जागा मिळत नाही आणि फोन जास्त गरम होऊ शकतो.
- चार्जिंग केबल वारंवार जोडणे आणि काढणे : यामुळे चार्जिंग पोर्ट खराब होते आणि फोनची बॅटरी लाईफ कमी होते.
- अति डिस्चार्जचा बॅटरीवर वाईट परिणाम होतो. चार्ज 20-80% च्या दरम्यान ठेवणे चांगले असते.
- रात्रभर फोन चार्जिंगला लावणे: या सवयीमुळे हळूहळू बॅटरी खराब होऊ शकते.
- चार्जिंग करताना कव्हर न काढणे : मोबाइल कव्हरमुळे उष्णता बाहेर पडत नाही आणि फोन लवकर गरम होऊ शकतो.
advertisement
advertisement
हे ही वाचा : अंडी उकळण्याचा 3-3-3 फाॅर्म्युला काय आहे? खरंच आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो का?
हे ही वाचा : तुम्हीही डास आणि झुरळांनी त्रस्त आहात? वापरा 'हा' नैसर्गिक उपाय; घरातून कायमचे होतील गायब!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 07, 2025 7:42 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
उन्हात स्मार्टफोन ‘ओव्हरहिट’ होतोय? तर फाॅलो करा 'या' 5 टिप्स, फोन कधीच होणार नाही गरम