तुम्हीही डास आणि झुरळांनी त्रस्त आहात? वापरा 'हा' नैसर्गिक उपाय; घरातून कायमचे होतील गायब!

Last Updated:
झुरळं आणि डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बाजारातील केमिकल्सपेक्षा घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरतो. निंबोळी तेल, कांद्याचा रस, मिरी पावडर आणि पाण्याने बनवलेला हा नैसर्गिक स्प्रे...
1/8
 घरात डास आणि झुरळांचा खूप त्रास होतो, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. एकीकडे झुरळे नुसती घाणच करतात असं नाही, तर किचनमधल्या वस्तूही खराब करून टाकतात. दुसरीकडे डासांमुळे मलेरिया, चिकुनगुनिया, डेंग्यू आणि जपानी मेंदूज्वर यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका असतो.

advertisement
2/8
 बाजारात यांना घालवण्यासाठी अनेक प्रकारचे केमिकल स्प्रे मिळतात, पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात आणि बऱ्याचदा त्याचा काही उपयोगही होत नाही. पण आता काळजी करण्याची गरज नाही! या लेखात आम्ही तुम्हाला आजीबाईंच्या काही खास उपायांबद्दल सांगणार आहोत, जे घरी बनवून वापरल्यास तुमच्या घरात डास आणि झुरळे दूरदूरपर्यंत दिसणार नाहीत.

3/8
 तुम्हाला हे नक्कीच आठवत असेल, की जेव्हा बाजारात डास आणि झुरळे मारण्यासाठी काहीच उपलब्ध नव्हते, तेव्हा आपल्या आजी आणि पणजी याच गोष्टींचा वापर करायच्या. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कडुलिंब, कांदा, पाणी आणि काळी मिरी लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा सोपा उपाय कसा बनवायचा आणि वापरायचा?

4/8
 हा घरगुती स्प्रे बनवण्यासाठी तुम्हाला 1 कप कडुलिंबाचे तेल, अर्धा कप कांद्याचा रस, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 लिटर पाणी आणि एक स्प्रे बॉटल लागेल. या साहित्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे एक प्रभावी स्प्रे बनवू शकता.

5/8
 सर्वात आधी एका भांड्यात कडुलिंबाचे तेल आणि कांद्याचा रस चांगला मिक्स करून घ्या. त्यात काळी मिरी पावडर टाकून पुन्हा एकदा मिक्स करा. आता हळू हळू पाणी टाकून हे मिश्रण पातळ करा. तयार झालेले मिश्रण गाळून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा.

6/8
 घरातील ज्या ठिकाणी डास आणि झुरळे जास्त प्रमाणात दिसतात, तिथे हा स्प्रे मारा. किचनमधील सिंक, गटारे, दारे, खिडक्या आणि भिंतींच्या भेगांमध्ये तो चांगल्या प्रकारे स्प्रे करा. डासांना दूर ठेवण्यासाठी घराच्या कोपऱ्यांमध्ये, पडद्यांच्या आसपास आणि बेडच्या खाली हलका स्प्रे करा. रात्री झोपण्यापूर्वी याचा वापर केल्यास डास तुमच्यापासून दूर राहतील.

7/8
 हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि आरोग्यासाठी सुरक्षित आहे. कडुलिंबाचे तेल एक प्रभावी कीटकनाशक आहे, जे डास आणि झुरळ्यांची वाढ थांबवते. कांद्याच्या तीव्र वासामुळे कीटक दूर राहतात, तर काळ्या मिरीची तिखट चव त्यांना त्रास देते आणि ते घरापासून दूर राहतात.

8/8
 डासांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या आसपास काही खास झाडे लावू शकता. झेंडू, तुळस, सिट्रोनेला आणि लॅव्हेंडर यांसारख्या झाडांच्या तीव्र वासामुळे डास दूर पळतात. ही झाडे केवळ डासांनाच दूर ठेवत नाहीत, तर घराच्या सौंदर्यातही भर घालतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement