TRENDING:

Maharashtra CM : महायुतीचा मुख्यमंत्री कोण? दीपक केसरकरांनी एका वाक्यात विषय संपवला..

Last Updated:

Maharashtra Government Formation : भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. या सगळ्या घडामोडीत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राज्यात महायुतीने बहुमत मिळवल्यानंतरही नवीन मुख्यमंत्री कोण, याचा तिढा अद्याप सुटला नाही. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. या सगळ्या घडामोडीत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
महायुतीचा मुख्यमंत्री कोण? दीपक केसरकरांनी एका वाक्यात विषय संपवला....
महायुतीचा मुख्यमंत्री कोण? दीपक केसरकरांनी एका वाक्यात विषय संपवला....
advertisement

आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्यपालांची भेट घेत आपला राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज करण्यास सांगितले आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

मुख्यमंत्री कोण? दीपक केसरकर म्हणाले...

advertisement

महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना दीपक केसरकरांनी म्हटले की, एक-दोन दिवसात भाजपचे आमदार आपला गटनेता निवडतील. त्यानंतर तिन्ही पक्षांचे नेते भाजपच्या नेतृत्त्वाशी चर्चा करतील. मुख्यमंत्रीपदाबाबत तिथेच निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे दीपक केसरकरांनी म्हटले.

 शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा...

advertisement

ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला. यावेळी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळण्याची विनंती केली. नवे सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. राजीनामा देत असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री उपस्थित होते.

महायुतीला बहुमत मिळालं असून आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाच्या नावावर देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

advertisement

भाजपला 5 अपक्षांचा पाठिंबा

भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्या आहेत. तसंच छोटे पक्ष, अपक्ष अशा 5 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि अशोक माने, युवा स्वाभीमानी पक्षाचे रवी राणा, अपक्ष शिवाजी पाटील यांचा समावेश आहे. या अपक्षांच्या पाठिंब्यामुळे विधानसभेत भाजपचं संख्याबळ 137 वर जावून पोहोचलं आहे आणि त्यामुळेचं भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचं नाव पुढे केलं जात आहे.

advertisement

इतर महत्त्वाची बातमी :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

Eknath Shinde : डर का माहौल है! CM एकनाथ शिंदेनीदेखील आमदारांकडून लिहून घेतली प्रतिज्ञापत्र

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Maharashtra CM : महायुतीचा मुख्यमंत्री कोण? दीपक केसरकरांनी एका वाक्यात विषय संपवला..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल