घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. इमारतीत मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट कार्यालये आहेत. त्यामुळे आग आजूबाजूच्या भागात पसरण्याची शक्यता जास्त आहे. या आगीत कोणीही मृत्युमुखी पडले नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या भीषण आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
advertisement
आग लागल्याची माहिती समजताच तातडीने इमारत रिकामी करण्यात आली. मात्र, या आगीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत.
ही आग नेमकी कशी लागली, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतरच्या तपासात आगीचे कारण समोर येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांसह, पोलीसदेखील उपस्थित आहेत.
