समोर आलेल्या माहितीनुसार, या रोपवे मुळे फिल्मसिटीपर्यंत सहज प्रवास करणे शक्य होईल. रोपवेमुळे पर्यटकांना पर्यटनस्थळी आणि नोकरदारांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचणे सुलभ होईल. आरे मेट्रो स्टेशन ते फिल्मसिटीपर्यंतचा रोपवे साधारण दोन ते तीन किलोमीटर लांबीचा असेल. त्याच्या मदतीने एका दिशेला एका तासात तोन ते तीन हजार प्रवासी प्रवास करू शकतील.
advertisement
Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद अवघ्या दोन तासांत, काय म्हणाले रेल्वे मंत्री
रोपवेमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. भुयारी मेट्रोतील प्रवासीसंख्या वाढवण्यास देखील मदत होईल. भुयारी मेट्रोतून आलेले प्रवासी रोपवेने थेट फिल्मसिटीमध्ये जाऊ शकतील. त्यामुळे त्यांना रस्त्याने प्रवास करावा लागणार नाही. हा रोपवे सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्त्वावर उभारला जाणार, असल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गाचे नियोजन, बांधकाम, विकास, संचालन हे एका खासगी कंपनीद्वारे केले जाईल व त्यानंतर ती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एमएमआरसीएल) हस्तांतरित केली जाईल.
सध्या मुंंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रोचे वेगात काम सुरू आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील कनेक्टिव्ही आणखी चांगली करण्यासाठी मेट्रोचा वापर केला जाणार आहे. मेट्रोच्या मदतीने प्रवाशांचा वेळ वाचू शकतो.
