TRENDING:

Mumbai Metro: मेट्रो 11 बाबत मोठी अपडेट, लोकार्पण वर्षासह तिकीट दर झाले निश्चित, वडाळा ते गेटवे किती पैसे लागणार?

Last Updated:

Mumbai Metro: वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया (अपोलो बंदर) मेट्रो 11 या मेट्रो लाईनबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईत सध्या मेट्रोचं जाळं वेगाने विस्तारत आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडी आणि लोकलच्या गर्दीतून सुटका व्हावी, मुंबई आणि उपनगरांची कनेक्टिव्हिटी जलट व्हावी, यासाठी मेट्रो उपयुक्त ठरू शकते, असं म्हटलं जात आहे. नव्याने बांधकाम सुरू होणाऱ्या वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया (अपोलो बंदर) मेट्रो 11 या मेट्रो लाईनबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया ही भुयारी मेट्रो 2031 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या मेट्रोच्या 18 किलोमीटर अंतरासाठी 60 रुपये भाडे निश्चित केलं असून, त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
Mumbai Metro: मेट्रो 11 बाबत मोठी अपडेट, लोकार्पण वर्षासह तिकीट दर झाले निश्चित, वडाळा ते गेटवे किती पैसे लागणार?
Mumbai Metro: मेट्रो 11 बाबत मोठी अपडेट, लोकार्पण वर्षासह तिकीट दर झाले निश्चित, वडाळा ते गेटवे किती पैसे लागणार?
advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो 11 लाईनची सुरुवात वडाळा येथील आणिक डेपोपासून सुरू होणार असून, शेवट गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहे. ही मेट्रो लाईन 17.51 किलोमीटर लांबीची असून त्यावर एकूण 14 स्टेशन्स असतील. यापैकी 13 स्टेशन्स भुयारी आणि एक स्टेशन जमिनीवर आहे. या लाईनच्या उभारणीसाठी 23 हजार 487 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तो भागवण्यासाठी तिकीट विक्रीव्यतिरिक्त 'नॉन फेअर बॉक्स' आणि अन्य माध्यमातूनही उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार आहे.

advertisement

Mount Mary Fair 2025: माउंट मेरी जत्रानिमित्त ‘बेस्ट’ निर्णय, 374 जादा बस, कुठून कुठं धावणार?

मेट्रो 11 लाईनची एकूण लांबी 17.51 किलोमीटर आहे. त्यापैकी 16.83 किलोमीटर मार्ग भूमिगत आहे तर 0.667 किलोमीटर मार्ग जमिनीवर आहे. या मार्गावर ताशी 80 किलोमीटर वेगाने सहा डब्यांची मेट्रो धावेल. आणिक बस डेपो, वडाळा डेपो, सीजीएस कॉलनी, गणेशनगर, बीपीटी हॉस्पिटल, शिवडी, हाय बंदर, दारूखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, सीएसएमटी, हार्मोनियम सर्कल, गेटवे ऑफ इंडिया या भागातून मेट्रो धावणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अंदाजानुसार, 2031 मध्ये 5.8 लाख, 2041मध्ये 8.69 लाख, 2051 मध्ये 9.8 लाख आणि 2055 मध्ये 10.12 लाख प्रवासी मेट्रो 11चा लाभ घेतील.

advertisement

शासनमंजुरी मिळालेले तिकीट दर

0 ते 2 किलोमीटरसाठी 10 रुपये, 2 ते 5 किलोमीटरसाठी 20 रुपये, 5 ते 8 किलोमीटरसाठी 30 रुपये, 8 ते 12 किलोमीटरसाठी 40 रुपये, 12 ते 15 किलोमीटरसाठी 50 रुपये आणि15 ते 18 किलोमीटरसाठी 60 रुपये तिकीट आकारले जाणार आहे.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Mumbai Metro: मेट्रो 11 बाबत मोठी अपडेट, लोकार्पण वर्षासह तिकीट दर झाले निश्चित, वडाळा ते गेटवे किती पैसे लागणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल