Mount Mary Fair 2025: माउंट मेरी जत्रानिमित्त ‘बेस्ट’ निर्णय, 374 जादा बस, कुठून कुठं धावणार?

Last Updated:

Mount Mary Fair 2025: माउंट मेरी जत्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा देखील 14 सप्टेंबरपासून ही जत्रा होत असून बेस्ट प्रशासनाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Mount Mary Fair 2025: माउंट मेरी जत्रानिमित्त ‘बेस्ट’ निर्णय, 374 जादा बस, कुठून कुठं धावणार?
Mount Mary Fair 2025: माउंट मेरी जत्रानिमित्त ‘बेस्ट’ निर्णय, 374 जादा बस, कुठून कुठं धावणार?
मुंबई: वांद्रे येथील सुप्रसिद्ध माउंट मेरी जत्रा यंदाही उत्साहात साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक आणि पर्यटक या जत्रेत सहभागी होणार आहेत. व्हर्जिन मेरीच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने 14 सप्टेंबरपासून 21 सप्टेंबरपर्यंत हा आठवडाभर चालणारा उत्सव वांद्रेच्या माउंट मेरी चर्चमध्ये आयोजित केला जातो. गर्दीच्या प्रमाणाची दखल घेत बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाने 374 अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्ट प्रशासनाने जाहीर केलेल्या विशेष वाहतूक योजनेनुसार, यात्रेच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे 321-मेरी, ए-202, ए-375, ए-422, ए-473, सी-71 आणि सी-505 या मार्गांवर विशेष बसेस तैनात करण्यात येणार आहेत. या बसेस नियमित सेवा देणार असून सकाळपासून रात्रीपर्यंत उपलब्ध राहतील. या बससेवा वांद्रे स्टेशन (पश्चिम) ते हिल रोड पार्कदरम्यान धावतील.
advertisement
सुरक्षा व गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने कोणतीही बस थेट माउंट मेरी चर्चपर्यंत जाणार नाही. हिल रोड पार्क येथे सर्व बससेवा संपतील आणि त्या ठिकाणाहून भाविकांना पायी चर्चकडे जावे लागेल. अरुंद गल्ल्या व संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी बेस्टने प्रमुख ठिकाणी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकारी तैनात केले आहेत. हे अधिकारी मार्गदर्शन करतील, रांगा नीट राखतील आणि आपत्कालीन स्थितीत मदत पुरवतील.
बेस्ट प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, त्यांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा आणि खासगी वाहनांचा वापर शक्यतो टाळावा. गर्दी व वाहतुकीचा योग्य समन्वय राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mount Mary Fair 2025: माउंट मेरी जत्रानिमित्त ‘बेस्ट’ निर्णय, 374 जादा बस, कुठून कुठं धावणार?
Next Article
advertisement
BMC Election Results: तुमच्या वॉर्डाचा निकाल कधी? मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डांसाठी यंदा मतमोजणीचा 'पाच टप्प्यांचा' फॉर्म्युला!
तुमच्या वॉर्डाचा निकाल कधी? BMCच्या २२७ वॉर्डांसाठी यंदा मतमोजणीचा 'पाच
  • राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वातावरण तापले आहे.

  • द्या, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर

  • मुंबई महापालिकेच्या मतमोजणीबाबत यंदा एक महत्त्वाचा बदल

View All
advertisement